35 हजार कोटींची बेवारस रक्कम; सरकारने उचलले ‘हे’ पाऊल

RBI च्या नियमानुसार, बचत अथवा चालू खात्यातील रक्कमेवर जर 10 वर्षांपर्यंत कोणी दावा केला नसेल तर ती रक्कम बेवारस रक्कम म्हणून गणली जाते.

98

बँक खात्यात अनेकजण आपल्या कष्टाचा पैसा जमा करतात. काही वेळा विविध कारणांनी एकापेक्षा अधिक बँक खाते सुरू केले जातात. मात्र, कालांतराने या बँक खात्याकडे खातेदाराचे दुर्लक्ष होते. त्याशिवाय अशीदेखील काही बँक खाती आहेत, त्या खात्यांवर कोणत्याही वारसांची नोंद नसते. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी अशाच बेवारस खात्यातील रक्कम रिझर्व्ह बँकेकडे सोपवली आहे. जवळपास 35 हजार कोटींची रक्कम आरबीआयकडे सुपूर्द करण्यात आली आहे.

केंद्रीय अर्थमंत्रालयाने मागील आठवड्यात संसदेला ही माहिती दिली. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी फेब्रुवारी महिन्यात रिझर्व्ह बँकेला 35 हजार 12 कोटींची रक्कम सुपूर्द केली. या रक्कमेला कोणताही वारस नव्हता. केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड यांनी लोकसभेत लिखित उत्तरात माहिती दिली. त्यांनी सांगितले की, सर्वाधिक बेवारस संपत्ती ही भारतीय स्टेट बँकेतील आहे. एसबीआयमध्ये 8086 कोटी रुपयांची संपत्ती बेवारसपणे होती. तर, पंजाब नॅशनल बँकेत 5340 कोटी रुपये, कॅनरा बँकेजवळ 4558 कोटी रुपये जमा बेवारस, कोणताही दावा नसणारी होती. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार, बचत अथवा चालू खात्यातील रक्कमेवर जर 10 वर्षापर्यंत कोणीही दावा केला नसेल तर ती रक्कम बेवारस रक्कम म्हणून गणली जाते. या पैशांना RBI ने स्थापन केलेल्या डिपॉझिटर एज्युकेशन अॅण्ड अवेअरनेस फंड’ मध्ये हस्तांतरीत केले जातात.

(हेही वाचा मी फडतूस नाही काडतूस, झुकेगा नही तो घुसेगा; देवेंद्र फडणवीस यांचा टोला)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.