इन्स्टाग्रामचे वापरकर्ते दिवसेंदिवस वाढत आहेत. शिवाय या अॅपच्या रिल्सला सुद्धा चांगला प्रतिसाद मिळत आहे परंतु बुधवार सकाळपासून काही युजर्सना त्यांचे इन्स्टाग्राम अकाऊंट व्यवस्थित चालू नसल्याचे निदर्शनात आले आणि सर्वांनी आपला मोर्चा ट्विटरवर वळवला. अखेर इन्स्टा डाऊन झाल्याच्या माहितीवर शिक्कामोर्तब झाले.
इन्स्टाग्राम डाऊन
ट्विटरच्या माध्यमातून इंस्टाग्राम डाऊन होत असल्याच्या तक्रारी लोक करत आहेत. ट्विटरवर सध्या #InstagramDown हॅशटॅग देखील ट्रेंड होत आहे. युजर्सच्या तक्रारीनुसार, त्यांना त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर लॉग इन करण्यात समस्या येत आहेत. यासोबतच काही युजर्स त्यांची खाती सस्पेन्शन झाल्याच्या तक्रारीही करत आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, भारत आणि इतर देशांमधील काही वापरकर्त्यांना लॉगिनसह सर्व्हर कनेक्शनशी संबंधित समस्यांचा सामना करावा लागत आहे.
ट्विटरवर भन्नाट मीम्स व्हायरल
जेव्हा मी इन्स्टाग्राम ओपन करते तेव्हा मला लॉगिन करण्यात समस्या येत आहे असे का असा सवाल करत या युजरने #InstagramDown लिहित इन्स्टाग्राम आणि मेटाला टॅग केले आहे.
https://twitter.com/thisissamayah/status/1643472307846004737
“बरं झालं इन्स्टा डाऊन झाले अन्यथा मला वाटले माझे अकाऊंट हॅक झाले” हा मीम सध्या ट्विटरला टॉपवर ट्रेंड करत आहे.
https://twitter.com/itsdavidmandal/status/1643467558362947584
https://twitter.com/Vashi_Star/status/1643462766714564608
Instagram going down!!!!!!!
— INSTAGRAM DOWN (@INSTAGRAMMDOWNN) April 5, 2023