शिक्षकाची नोकरी करायची असेल तर डीएड पदवी हे समीकरण कायम होते, पण आता नव्या धोरणानुसार यात अमुलाग्र बदल करण्यात आला आहे. राज्य सरकारने डीएड हा अभ्यासक्रम कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. देशाच्या इतर भागांतही हा अभ्यासक्रम बंद करण्यात आलेला आहे. सरकारने यासाठी आता राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला मान्यता दिली आहे. त्यामुळे यापुढे आता तुम्हाला जर शिक्षक बनायचे असेल तर सर्व पदवी अभ्यासक्रम चार वर्षांच्या कालावधीचे असणार आहेत.
नवीन शैक्षणिक धोरणानुसार बदल
केंद्र सरकारने राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला मान्यता दिल्यामुळे त्या संदर्भातील सर्व अंमलबजावणी सुरु झाली आहे नवीन शैक्षणिक धोरणामुळे आता शिक्षक होण्यासाठी बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर चार वर्षांची बीएड पदवी घ्यावी लागणार आहे. बीएडचे विद्यार्थी कोणत्याही विषयात स्पेशलायझेशन करू शकतील. चार वर्षांची पदवी त्यानंतर सहा महिन्यांची इंटर्नशिप करावी लागणार आहे. हे नवीन धोरण राज्यातील सर्व बिगर कृषी विद्यापीठांमध्ये 2023-24 या शैक्षणिक वर्षापासून काही महिन्यांत लागू होणार आहे. त्यामुळे हे सर्व बदल आगामी सत्रात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना लागू होणार आहे. सध्या हे धोरण डी.एड किंवा बीएडचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना लागू होणार नाही आणि त्यांचे अभ्यासक्रम पूर्वीप्रमाणेच सुरू राहणार आहेत. पदव्युत्तर पदवी घेतलेले विद्यार्थी एका वर्षात बीएड करू शकणार आहेत. याआधी बारावीनंतर डीएड दोन वर्षांत करता येत होते आता त्यासाठी चार वर्षे लागणार आहेत.
Join Our WhatsApp Community