पूर्व द्रुतगती महामार्गावरील भांडुप ते विक्रोळी दरम्यान मुंबई सुशोभिकरणाअंतर्गत पदपथ, रस्ता दुभाजक, रंगरंगोटी आदींच्या माध्यमातून सौंदर्यीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. याअंतर्गत विविध कामे हाती घेण्यात आली. यासाठी सुमारे ८ कोटी रुपये खर्च करण्यात येत आहे.
‘एस’ विभागातील विविध पदपथ, वाहतूक बेटे, उड्डानपुलाखालील मोकळ्या जागेचे सुशोभिकरण, सुविधा शौचालये आणि भिंतींना रंगरंगोटी करण्याची कामे ‘एस’ विभागामध्ये करण्यात आलेली आहे. भांडुप विभागातील विविध पदपथ, वाहतूक बेटे, उड्डानपुलाखालील मोकळ्या जागेचे सुशोभिकरण, सुविधा शौचालये आणि भिंतींना रंगरंगोटी करण्याची कामे ‘एस’ विभागामध्ये करण्यात आलेली आहे. भांडुप (प.), पूर्व द्रुतगती महामार्गावरील गोरेगाव मुलुंड जोडरस्ता छेदावरील उड्डाण पुलाला सजावटीचे रंगकाम, पूर्व द्रुतगती महामार्गावरील ऐरोली नाका जंक्शन ते पी गोदरेज जंक्शन लगतच्या पदपथांचे सौंदर्यीकरण, भांडुप पूर्व येथील पूर्व द्रुतगती महामार्गाच्या मध्य दुभाजकांमध्ये फुलांची झाडे व हिरवळ लावणे, भांडुप पूर्व द्रुतगती महामार्गावरील ऐरोली जंक्शन ते मोटादेवी पादचारी पूलामधील महामार्गालगत पदपथांचे सौंदर्यीकरणाची कामे हाती घेण्यात आली आहे. महापालिका एस विभागाचे सहायक आयुक्त अजित आंबी यांच्या नेतृत्वाखाली ही कामे सुरु आहे.
(हेही वाचा मोदी, शाह, फडणवीसांवर टीका करता याला माफी नाही भरपाई होणार; नारायण राणेंचा इशारा)
अशाप्रकारे घेतली कामे हाती
- भांडुप पश्चिम पूर्व द्रुतगती महामार्गावरील गोरेगाव मुलुंड जोडरस्ता छेदावरील उड्डाण पुलाला सजावटीचे रंगकाम
- होणारा खर्च : ८३ लाखा १४ हजार
- नियुक्त कंत्राटदार : रीओ युनिवर्सल
ऐरोली नाका जंक्शन ते पी गोदरेज जंक्शन लगतच्या पदपथांचे सौंदर्यीकरण
- होणारा खर्च : ३ कोटी २१ लाख ९७ हजार
- नियुक्त कंत्राटदार : हर्षिल एंटरप्रायझेस
मध्य दुभाजकांमध्ये फलांची झाडे व हिरवळ लावणे
- होणारा खर्च : १ कोटी ४४ लाख ४६ हजार
- नियुक्त कंत्राटदार : भूमी कॉर्पोरेशन
ऐरोली जंक्शन ते मोटादेवी पादचारी पूलामधील महामार्गालगत पदपथांचे सौंदर्यीकरण
- होणारा खर्च : २ कोटी ५५ लाख ४५ हजार रुपये
- नियुक्त कंत्राटदार : प्रलिता इन्फ्राप्रोजेक्ट