नुपूर शर्मानंतर आता काजल हिंदुस्थानींच्या विरोधात ‘सर तन से जुदा’च्या धमकी

204

नुकतेच देशभरात रामनवमीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मात्र त्याचवेळी देशातील तब्बल ७ राज्यांत धर्मांध मुसलमानांनी दंगली घडवून आणल्या. या उत्सवाच्या दरम्यान गुजरात राज्यात धर्मांध मुसलमानांचे उग्र रूप पाहायला मिळालेले. काही दिवसांपूर्वी धर्मांध मुसलमानांनी ज्ञानव्यापी क्षेत्रात सापडलेल्या शिवलिंगाचे विडंबन केल्यावर त्यांना जोरदार प्रत्युत्तर देणाऱ्या भाजपच्या नेत्या नुपूर शर्मा यांच्या विरोधात धर्मांध मुसलमानांनी ‘सर तन से जुदा’ अशी घोषणा दिली होती, तीच घोषणा रामनवमीच्या दिवशी भाषण देणाऱ्या काजल हिंदुस्थानी यांच्या विरोधात धर्मांधांनी दिली. महत्वाची बाब म्हणजे नूपुर शर्मा यांचे समर्थन केले म्हणून धर्मांध मुसलमानांनी उदयपुरमधील कन्हैय्या लाल यांचे शीर धडा वेगळे केले होते, तशीच हत्या अमरावतीच्या उमेश कोल्हे यांचीही नूपुर शर्मा यांच्या समर्थनार्थ पोस्ट लिहिली म्हणून मुसलमानांनी केली होती.

काजल हिंदुस्थानी का आल्या चर्चेत?

अनंतापर्यंत माणसाला जगण्याचे धडे देणाऱ्या श्रीरामाच्या जन्मोत्सवाच्या दिवशी, म्हणजेच रामनवमीच्या दिवशी देशातील नानाविध ठिकाणाहून शोभायात्रा निघाल्या. गुजरात राज्यातील गिर – सोमनाथ जिल्ह्यात निघालेल्या शोभायात्रेत तब्बल ३०,००० श्रद्धाळू भाविकांनी उपस्थिती दर्शवली होती. भव्य यात्रेनंतर भाविकांसाठी एका विशेष धार्मिक सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या सभेला मुळच्या राजस्थानच्या असलेल्या काजल संबोधणार होत्या. ह्या जाहीर सभेत हिंदूना उद्देशून त्यांनी जे भाषण केले होते, ते अल्पसंख्यांकांच्या भावना दुखवणारे आहे असा बिनबुडाचा आरोप करत त्यांच्या विरोधी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भारतीय संस्कृतीच्या पुनरूत्थानासाठी प्रयत्नशील असलेल्या काजल हिंदुस्थानी सध्या गुजरातमधील जामनगर या भागात राहातात. सभेच्या दुसऱ्या दिवशी त्यांच्या भाषणाचा धर्मांधांनी आपल्या सोयीने अर्थ काढत, दंगल घडवून आणण्याचा मानस पूर्ण करण्यासाठी दगडफेक करायला सुरवात केली. ३१ मार्चला काजोल यांनी भाषणात लव्ह जिहाद आणि लँड जिहादचा जो उल्लेख केला होता, त्याला विवादास्पद ठरवत समाज बिघडवणारे कृत्य करण्यास सुरुवात केली. त्यावेळी धर्मांध मुसलमानांनी ‘सर तन से जुदा’ च्या घोषणा दिल्या ज्याने तणाव वाढला.

(हेही वाचा ‘हिंदु राष्ट्र’ संकल्पनेला छेद देणाऱ्यांचा प्रयत्न हाणून पाडण्याची आवश्यकता! – रमेश शिंदे)

…आणि तणाव आणखी वाढला 

या भागात परिस्थिती अधिक चिघळत चालली आहे, असे दिसताच पोलिसांनी या भागातील हिंदू आणि मुस्लिम गटाच्या पाच मुख्य नेत्यांना बोलावले. दोन गटांची ही सभा समंजस्याच्या ऐवजी वैमनस्याकडे आणि अधिकच्या ताणाकडे घेऊन जाणारी ठरली. मतांतर झाल्यामुळे मुस्लिम गटाच्या नेत्यांनी सभात्याग केला. त्यांच्या सभात्यागाची वार्ता शहराच पसरताच परिसरातील बाजार तात्काळ बंद करण्यात आला. तर संध्याकाळी कुंभरवाडा, कोलीवाड, चंद्रकिरण समाज क्षेत्राच्या भागात दगडफेकीसह सोड्याच्या बाटल्या फेकण्यात आल्या. ‘सर तन से जुदा’ अशा आरोळ्या देत धर्मांध मुसलमान तरुणांनी रस्ता अडवून ठेवला. मोठ्या प्रयत्नांनी पोलिसांनी या गर्दीवर नियंत्रण मिळवले. शनिवारी पुन्हा दगडफेक करण्यात आली. पोलिसांनी कडक कारवाई करत ७० आरोपींना अटक केली. तलवार, चाकू, कुऱ्हाड, वस्तरा, लोखंडाचे पाईप, काचेच्या मोठ्या बाटल्या – अशी जीवघेणी हत्यारे धर्मांध मुसलमानांकडून जप्त करण्यात आली. ही हत्यारे त्यांच्याकडे त्याच दिवशी कशी आली कि हा प्रकार पूर्वनियोजित होता, अशी चर्चा आता सुरु झाली आहे.

काजल त्यांच्या भाषणावर ठाम 

एका वृत्तवाहिनीला काजल हिंदुस्थानी यांनी २ एप्रिलला मुलाखत दिली. त्यात त्या म्हणाल्या, की “मी लव्ह जिहाद, लँड जिहाद सारख्या योजनांच्या विरोधात बोलत आहे, त्यामुळे मी काही चुकीचे बोलत आहे किंवा द्वेषपूर्ण भाषण देत आहे असे मला वाटत नाही.” मुलाखतीपूर्वी जनमानसात अशी कुजबूज होती की काजल या त्यांची बाजू मांडतील, भाषणाबद्दल सफाई देतील. मात्र त्यांनी असे काहीही केली नाही. उलट त्या असे म्हणाल्या, की आज देशात हिंदूंनी श्वास घेतला तरी काही लोक त्याला द्वेषयुक्त भाषण समजतील.

देशभरात दंगली घडवण्याचे मुसलमानांचे कारस्थान 

हिंदूंच्या संरक्षणासाठी बोलणे म्हणजे इतर धर्मियांचा अवमान होत नाही, तरीही धर्मांध मुसलमान अनेकदा याचाच बाव करून दंगली घडवतात.

रामनवमीच्या दिवशी कोणत्या राज्यांत झाल्या दंगली?

  • महाराष्ट्र – संभाजी नगर, जळगाव, मालाड
  • पश्चिम बंगाल – हावडा, डालखोला
  • झारखंड – साहिबगंज
  • गुजरात – वडोदरा
  • कर्नाटक – हासन
  • बिहार – नालंदा
  • उत्तर प्रदेश – लखनऊ
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.