‘या’ उन्हाळ्यात हैद्राबाद होणार कूल; तेलंगणा सरकारची कूल रूफ पॉलिसी

112

जागतिक तापमानात धक्कादायक वाढ होते आहे, हिमनग आश्चर्यकारक वेगाने वितळत आहेत, अशा स्वरूपाच्या वार्ता तुमच्या कानावर कधी ना कधी पडल्या असतीलच. पर्यावरणाचा समतोल बिघडवणाऱ्या अशा बातम्या ऐकून तुम्ही कदाचित निराशा होत असेल. सर्वसाधारणपणे तुम्हाला हेच वाटत असेल की, याबद्दल काहीतरी करायला हवं. मात्र सरकारकडून या महत्त्वाच्या विषयावर केव्हाही ठोस उपाययोजना केल्या जात नाहीत. तुम्हाला हे ऐकल्यावर नक्कीच आनंदाचा धक्का बसेल, कारण दक्षिणेतल्या एका प्रगतशील राज्याने या विषयी प्रेरक आणि दमदार पाऊले उचलत नवा पायंडा घातला आहे.

जागतिक तापमान का वाढतं?

  • ग्रीन हाऊस गॅसेस
  • गाड्या, अवजड वाहने यांतून निघणारा धूर
  • बेसुमार जंगलतोड

सध्या जागतिक तापमान आटोक्यात आणण्यासाठी काय प्रयत्न केले जातात?

  • वृक्षांची लागवड
  • जनजागृती
  • पुनर्वापराला प्राधान्य

गावाकडे आहे थंड हवा, मग शहरात उकडतंय का?

बेसुमार जंगलतोड, कारखाने, वाहनांतून निघणारे विषारी वायू ह्या घटकांमुळे शहरातील वातावरण वेगाने वाढते. याशिवाय आणखी एक कारण उष्णता वाढायला प्रोत्साहन देत. ते म्हणजे शहरातील सर्व प्रकारच्या सिमेंटच्या इमारती. या इमारती उष्णता शोषून घेतात.

(हेही वाचा ईडी, सीबीआयच्या विरोधात याचिका फेटाळली; सर्वोच्च न्यायालयाने विरोधी पक्षांना सुनावले)

तेलंगणा सरकारने काय केलं? 

तेलंगणा सरकराने कूल रूफ पॉलिसी जाहिर केली आहे. हे देशातील सर्वात प्रथम राज्य आहे, जिथे कूल रूफ पॉलिसी राबवण्याची घोषणा करण्यात आली आहे. पहिल्या वर्षात सरकारने ७.५ किलोमीटर क्षेत्रात कूल रूफ पॉलिसी अवलंबण्याचे ठरवले आहे. यात तेलंगणातील महत्त्वाचे शहर असलेल्या हैद्राबादमधील ५ किलोमीटरचा समावेश आहे. कोणत्याही प्रकारची सरकारी इमारत, सरकारच्या मालकीची कोणतीही इमारत, कुठल्याही व्यक्तिच्या मालकीच्या ५,४०० स्क्वेअर फूटवरील बांधकामावर कूल रूफ असणं अनिवार्य होणार आहे.

या कूल रूफ पोलिसीचे काय ध्येय आहे?

  • शहरातील तापमान कमी करणे.
  • हळूहळू संपूर्ण राज्यभर ही योजना अनिवार्य करणे.

कूल रूफ म्हणजे नेमकं आहे काय?

यात शहरातींल सर्व इमारतींच्या छप्पराला एक विशिष्ट प्रकारचा रंग दिला जातो. यामुळे अशा छप्परांवर जेव्हा सूर्यकिरणे आदळतात, तेव्हा ते पुन्हा वातावरणात परावर्तित होतात.

कूल रूफचा काय फायदा?

  • घरातील तापमान कमी होते.
  • सूर्यकिरणे वातावरणात पुन्हा परावर्तित होतात. त्यामुळे एकूणच वातावरण हळूहळू थंडावते.

भविष्यात उद्धवणाऱ्या संकटांना आत्मविश्वासाने सामोरे जाण्यासाठी कूल रूफची संकल्पना उपयोगी ठरेल. यात परिसरातील इमारतीच्या छप्पराला विशिष्ट प्रकारच्या रंगानी रंगवून, विशिष्ट प्रकारच्या टाईल्स कव्हर्सचा वापर केला जातो.ज्यामुळे शहरातील तापमान कमी व्हायला मदत होते.

तेलंगणातील एकूण जनतेपैकी जवळपास ५० टक्के 

जनता ही राज्याच्या शहरी भागात राहाते. त्यामुळे त्यांचे दैनंदिन जीवन या कूल रूफमुळे निश्चितच सुकर होईल.

(हेही वाचा फडणवीसांवर बोलण्याची उद्धव ठाकरेंची लायकी आहे का; नारायण राणेंचा घणाघात )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.