देशातील कोरोना रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी देशात ४ हजार ४३५ लोकांना कोरोनाची लागण झाली असून १५ जणांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्र आणि केरळमध्ये प्रत्येकी चार आणि छत्तीसगड, दिल्ली, गुजरात, हरियाणा, कर्नाटक, पुदुच्चेरी आणि राजस्थानमध्ये प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे.
( हेही वाचा : आपल्या मुलांसाठी ‘आरटीई’ प्रवेश अर्ज केलात का? १२ एप्रिलला कळेल सोडतीचा निकाल)
भारतात कोरोनासह H3N2 चा धोकाही वाढत आहे. वाढता धोका पाहता गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरण्याचे आवाहन नीती आयोगाने यापूर्वीच केले आहे. तसेच सोशल डिस्टन्स आणि शक्यतो गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा असे आवाहन आरोग्य मंत्रालयाकडून करण्यात येत आहे. श्वास घेण्यास त्रास, ताप आणि खोकला ५ दिवसांपेक्षा अधिक काळ असेल तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या असेही आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे.
राज्य सरकारला टास्क फोर्सकडून सूचना
गेल्या काही दिवसांपासून चीन आणि दुबईतून येणाऱ्या प्रवाशांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे या दोन्ही ठिकाणांवरून येणाऱ्या नागरिकांची कोरोना चाचणी करावी अशा सूचना टास्क फोर्सने राज्य सरकारला दिल्या आहेत. सध्या परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची विमानतळावर तपासणी करण्यात येत आहेत. यातील पॉझिटिव्ह आलेल्या प्रत्येकाचे नमुने जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात येत आहेत. अशी माहिती देण्यात आली आहे.
Join Our WhatsApp Community