भाजपने हनुमानापासून प्रेरणा घ्यावी! भ्रष्टाचार आणि घराणेशाहीच्या राजकारणाविरोधात आपण जोरदार लढा देऊ – पंतप्रधान

169

रामभक्त हनुमानाने जसे राक्षसांशी युद्ध केले तसेच आपण भ्रष्टाचार आणि घराणेशाहीच्या विरोधात संघर्ष करू, हनुमानाचे कार्य आपल्याला प्रेरक असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. भारतीय जनता पक्षाच्या स्थापनादिनानिमित्त ते पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना बोलत होते.

यावेळी पंतप्रधान म्हणाले की, रावणाशी युद्ध करताना जेव्हा लक्ष्मणावर संकट आले, तेव्हा हनुमानजींनी संपूर्ण पर्वत वाहून नेला. याच प्रेरणेतून भाजपनेही जनतेचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केलाय आणि यापुढंही सुरू ठेवणार आहे. भ्रष्टाचार आणि कायदा सुव्यवस्थेशी लढण्यासाठी भाजपला हनुमानापासून प्रेरणा मिळते. जर आपण भगवान हनुमानाच्या संपूर्ण जीवनावर नजर टाकली, तर त्यांच्याकडे “Can Do” वृत्ती होती, त्यामुळे त्यांना सर्व प्रकारचं यश मिळण्यास मदत झाली. आमचा पक्ष भारत माता, संविधान आणि राष्ट्रासाठी समर्पित असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.

मोठ्या आव्हानांना तोंड देण्यासाठी भारत मजबूत

‘आज भारत बजरंग बली सारख्या महासत्तेची जाणीव करून देत आहे. सागरासारख्या मोठ्या आव्हानांना तोंड देण्यासाठी भारत मजबूत झाला आहे. आमचा पक्ष, आमचे कार्यकर्ते हनुमानजींची मूल्ये आणि शिकवणीतून सतत प्रेरणा घेत आहेत. हनुमानजी काहीही करू शकतात, प्रत्येकासाठी करतात. पण, स्वत:साठी काहीही करत नाहीत. यातूनच भारतीय जनता पक्षाला प्रेरणा मिळते. हनुमानजींमध्ये अफाट शक्ती आहे, परंतु ते या शक्तीचा उपयोग तेव्हाच करू शकतात, जेव्हा त्यांचा आत्मविश्वास संपेल. 2014 पूर्वी भारताचीही अशीच परिस्थिती होती, पण आज भारताला बजरंगबलीजींसारख्या आपल्यात दडलेल्या शक्तींची जाणीव झाली आहे. समुद्रासारख्या मोठ्या आव्हानांवर मात करण्यासाठी आणि त्यांना तोंड देण्यासाठी आज भारत पूर्वीपेक्षा अधिक सक्षम झाल्याचे मोदींनी स्पष्ट केले.

घराणेशाहीच्या राजकारणाविरोधात आम्ही जोरदार लढा देऊ – पंतप्रधान 

जेव्हा हनुमानजींना राक्षसांचा सामना करावा लागला, तेव्हा ते तितकेच कठोर झाले. त्याचप्रमाणे भ्रष्टाचाराचा प्रश्न येतो, घराणेशाहीचा प्रश्न येतो, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न येतो तेव्हा भाजपही तितकाच कठोर होत आहे. भ्रष्टाचार आणि घराणेशाहीच्या राजकारणाविरोधात आपण जोरदार लढा देऊ असे पंतप्रधान म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.