ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात बुधवारी ठाण्यात जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी मोर्चाला प्रचंड गर्दी झाली होती, मोठ-मोठ्यांनी सरकारविरोधात घोषणाबाजी केली जात होती. यामध्ये ठाकरे गटाच्या युवासेनेच्या सचिव दुर्गा भोसले-शिंदे देखील जोरदार घोषणा देत होत्या. पण या घोषणाबाजीदरम्यान अचानक त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे त्यांना तात्काळ मुंबईच्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. पण बुधवारी मध्यरात्रीच उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवल्याची धक्कादायक घटना घडली. हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं अवघ्या ३०व्या वर्षी त्यांचं निधन झालं.
दुर्गा भोसले-शिंदे यांच्या पश्चात पती, आई, वडील आणि भाऊ असा परिवार आहे. गुरुवारी सायंकाळी ५ वाजता धीरज अपार्टमेंट, पेडर रोड, जसलोक हॉस्पिटलच्या बाजूला, कंबाला हिल, मुंबई येथून त्यांची अंत्ययात्रा निघणार आहे. आणि अंत्यसंस्कार बाणगंगा स्मशानभूमी, वाळकेश्वर येथे होणार आहेत.
दरम्यान ठाकरे गटाच्या पदाधिकारी रोशनी शिंदे यांना मारहाण झाल्याच्या निषेधार्थ बुधवारी ठाण्यात ठाकरे गटाचा जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वात ठाकरे गटाचा हा जनआक्रोश मोर्चा आयोजित करण्यात आला होता. ठाण्याच्या पोलीस आयुक्तालयावर हा मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चाला मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती. यावेळी जमलेले ठाकरे गटाचे कार्यकर्ते पोटतिकडीनं घोषणाबाजी करत होते. यात युवासेनेच्या सचिव दुर्गा भोसले-शिंदे देखील जोरजोरात घोषणा देताना दिसला. पण अचानक त्यांना अस्वस्थ वाटू लागलं. छातीत दुखू लागलं. त्यामुळे वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी त्यांना तातडीनं विश्रांती घेण्यास सांगितलं.
त्यामुळे त्यांना तात्काळ उपचारासाठी मुंबईला पाठवण्यात आलं आणि बॉम्ब हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल केलं. मात्र, उपचार सुरू असतानाच बुधवारी रात्री १.३० वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. वयाच्या अवघ्या ३०व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. हृदयविकाराच्या झटक्यानं त्यांचे निधन झाल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली. त्यांच्या निधनामुळे सध्या शिवसैनिकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
(हेही वाचा – सरकारला मदत करणाऱ्या आयपीएस, आयएएस अधिकाऱ्यांना आदित्य ठाकरेंची धमकी)
Join Our WhatsApp Community