सध्या देशासह राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. दर दिवसाला कोरोना संसर्गाच्या रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. त्यातच सांगली येथील जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील एका कच्च्या कैद्याला कोरोनाची लागण झाल्याचे उघड झाल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे कारागृह प्रशासन तात्काळ सतर्क झाले आहे. त्या कैद्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
कोरोनाच्या पहिल्या लाटेत येथील जिल्हा मध्यवर्ती कारागृहात अनेक बंदींना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर प्रशासनाने तातडीने स्वतंत्र अलगीकरण कक्ष स्थापन केला होता. त्यावेळीही कारागृह हाऊसफुल्ल असतानाही कोरोना संसर्ग रोखण्यात आरोग्य यंत्रणेला यश आले. त्यानंतर कारागृहात संसर्ग रोखण्यासाठी योग्य ती काळजी घेण्यात आली. मात्र गेल्या काही दिवसांत कोरोनाने पुन्हा डोके वर काढण्यास सुरूवात केली आहे. काही दिवसांपूर्वी सांगली शहरातील काही जणांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर महापालिका आणि जिल्हा आरोग्य प्रशासनाकडून तातडीने उपाययोजना सुरूवात करण्यात आल्या आहे.
(हेही वाचा छत्रपती संभाजीनगर नामांतराविरोधातील याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली; नावे बदलण्याचा अधिकार सरकारचा)
संपर्कातील कैद्यांची तपासणी
कारागृह प्रशासनाने कोरोना पॉझिटिव्ह कैद्याच्या संपर्कात आलेल्या अधिकारी, कर्मचारी यांची तातडीने तपासणी केली. अद्याप तरी एकच रुग्ण असून त्याची प्रकृती स्थिर आहे. दरम्यान, येथील जिल्हा कारागृहात 419 पुरूष आणि 15 महिला बंदी आहेत.
Join Our WhatsApp Community