एकदा भूक लागल्यानंतर काही खाल्लं किंवा जेवलं तर पुन्हा भूक लागतं नाही, ही सामान्य गोष्ट आहे. पण काही लोकांना पोट भरून खाल्लं तरी पुन्हा काही वेळात भूक लागते. तसंच काहींना राग आल्यानंतर किंवा दुःखी झाल्यानंतर स्वतःला शांत करण्यासाठी खाण्याची सवय असते, याला इमोशनल ईटिंग म्हणतात. जास्त खाण्याला अनेक कारणं असून शकतात, परंतु यामागची कारण जाणून घेणं खूप गरजेच आहे. त्यामुळे आज आपण खूप जास्त भूक लागणं, यामागची कारणं सविस्तर जाणून घेणार आहोत.
यामुळे लागते भूक
झोप पूर्ण न होण
जर तुम्ही पुरेशी झोप घेतली नाही तर तुम्हाला जास्त भूक लागण्यास सुरुवात होते. कारण कमी झोप तुमच्या भूकेला नियंत्रण करणाऱ्या हार्मोनवर परिणाम करते. ज्या लोकांची पूर्ण झोप होत नाही, त्यांना भूक जास्त लागते आणि खाल्ल्यानंतरही पोट भरल्यासारखं वाटतं नाही.
प्रोटीनची कमतरता
शरीरातील प्रोटीनच्या कमतरतेमुळे तुम्हाला सतत भूक लागत राहते. प्रोटीन भूकेवर नियंत्रण ठेवण्यास मदत करते, ज्यामुळे तुमच्या कॅलरीजचे प्रमाण कमी होते. डाएटमध्ये प्रोटीन सामिल केल्यामुळे शरिरातील काही अशा हार्मोन्सची वाढ होते, ज्यामुळे तुम्हाला पोट भरल्यासारखं वाटतं आणि तुमची भूक नियंत्रित होते.
डिहाइड्रेशन
शरीर स्वस्थ ठेवण्यासाठी जास्तीत जास्त पाण्याचं सेवन करणं आवश्यक आहे. पाणी तुमच्या हृदयाच्या आरोग्यासाठी, मेंदूच्या आरोग्यासाठी आणि पचनासाठी महत्त्वाचे आहे. पाणी जास्त प्यायल्यानं तुम्हाला पोट भरल्यासारखं वाटत. जेव्हा तुम्ही पाणी कमी पिता, तेव्हा तुम्हाला खूप भूक जास्त लागते.
मधुमेह
मधुमेहग्रस्त असलेल्या लोकांना इतर सामान्य लोकांपेक्षा जास्त भूक लागते. कारण त्यांच्या इन्सुलिनमुळे रक्तातील ग्लुकोज पेशींमध्ये प्रवेश करू शकत नाही. ज्यामुळे शरीर अन्नाचे ऊर्जेत रूपांतर करू शकत नाही आणि त्यामुळे मधुमेहग्रस्तांना सतत भूक लागते.
गर्भधारणा
गरजेपेक्षा जास्त भूक लागण्याचं आणखी एक कारण म्हणजे गर्भधारणा. कारण पोटामध्ये आणखी एक जीव असल्यामुळे त्याला सर्व पोषक घटक मिळणं गरजेच असतं. त्यामुळे या अवस्थेमध्ये आहाराची विशेष काळजी घेणं आणि योग्य अंतरानं खाणं महत्त्वाचं असतं.
(हेही वाचा – ‘हार्वर्ड डाएट प्लॅन’ म्हणजे काय? आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश करावा, काय खाऊ नये…जाणून घ्या)
Join Our WhatsApp Community