अमेरिकेत चर्चमध्ये १५० पाद्र्यांकडून ६०० मुलांचे लैगिक शोषण

१०० पीडितांच्या साक्षीनंतर एक लाख पानी कागदपत्राचा अभ्यास केल्यानंतर हा रिपोर्ट तयार झाला.

110

चर्चमध्ये होणाऱ्या लैंगिक शोषणाची अजून एक घटना समोर आली आहे. अमेरिकेच्या मेरीलॅंड राज्याच्या कॅथाॅलिक चर्चमध्ये ६०० पेक्षा जास्त मुलांचे लैगिक शोषण केले गेले. शोषण करणाऱ्यांमध्ये जवळजवळ १५० पाद्री होते. ४६३ पानी रिपोर्टमुळे याचा खुलासा झाला.

चार वर्षांच्या संशोधनानंतर हा रिपोर्ट बनवला गेला. बुधवारी, ५ एप्रिलला रिपोर्ट  प्रसिद्ध करण्यात आला. रिपोर्टमधल्या त्या पाद्रींची ओळख केली गेली आहे, ज्यांचा १९४० पासून लैंगिक शोषणामध्ये सहभाग होता. २०१९ मध्ये तत्कालीन अॅटर्नी जनरल ब्रायन फ्रॉश असताना या घटनेचा तपास सुरू केला गेला. १०० पीडितांच्या साक्षीनंतर एक लाख पानी कागदपत्राचा अभ्यास केल्यानंतर हा रिपोर्ट तयार झाला.

(हेही वाचा जॉन्सन अँड जॉन्सनची कॅन्सरला कारणीभूत ठरणारी उत्पादने झाली बंद; अमेरिकेत कंपनी देणार भरपाई; भारतात मात्र मौन)

चर्चकडून कित्येक वर्षे लपवण्यात आले

हा रिपोर्ट गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्येच तयार होता, पण न्यायालयीन परवानगी मिळाल्यानंतर हा रिपोर्ट जारी करण्यात आला. यामध्ये ज्या मुलांचे शोषण करण्यात आले आहे ते गरीब कुटुंबातील होते. शांत बसण्यासाठी त्यांना धमकवण्यातही आले. ही गोष्ट ८० वर्षांनंतर समोर आली. चर्चकडून ही घटना कित्येक वर्षे लपवून ठेवण्यात आली. रिपोर्ट प्रसिद्ध झाल्यानंतर बाल्टीमोरचे आर्कबिशप विलियम लोरी यांनी पीडित मुलांची माफी मागितली आहे. कॅथाॅलिक चर्चच्या इतिहासात आतापर्यंतची सर्वांत दु:खद घटना आहे, ज्याला दुर्लक्ष आणि विसरून चालणार नाही. चर्चच्या उच्च पदावर असणाऱ्या व्यक्तीद्वारे अशा प्रकारची कृत्य करणाऱ्यांना शिक्षा केली जाईल, असेही लोरी म्हणाले.

यापूर्वी अमेरिकेच्या इलिनोइस प्रांतातमध्ये जवळजवळ ७०० पाद्रींवर लहान मुलांच्या लैंगिक शोषणाचे आरोप होते. इलिनोइसच्या अॅटर्नी जनरल यांनी आपल्या रिपोर्टमध्ये अशा घटनांचा उल्लेख केलेला. चर्चने आरोपींची संख्या १८५ सांगितली होती, पण अॅटर्नी जनरल यांनी अशा पाद्रींची संख्या यापेक्षा जास्त असल्याचे सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.