भौगोलिक मानांकनामुळे लोकप्रिय; अलिबागच्या पांढऱ्या कांद्याची मागणी वाढली

118

रायगड जिल्ह्यात अलिबाग तालुक्यात लागवड होणारा पांढरा कांदा म्हणजे जणू पांढरे सोनेच आहे. या कांद्यास भौगोलिक मानांकन मिळाल्यानंतर तो अधिकच लोकप्रिय होत आहे. खंडाळा, पवेळे, नेहुली, सहाण, ढवर, कार्ले, रेवदंडा, चौल, नागाव, आक्षी, वरसोली, थळ, नवगाव, किहीम, आवास अशा अलिबाग नजिकच्या ठराविक गावांमध्ये पांढऱ्या कांद्याची साधारणपणे 250 हेक्टर क्षेत्रावर लागवड केली जाते.

अलिबागचा पांढरा कांदा लाल गुलाबी कांद्यासारखा तिखट नसून गोड असतो. डॉ. बाळासाहेब कोकण कृषी विद्यापीठ दापोली अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र रोहा, ग्रेट मिशन ग्रुप कन्सलटन्सी पुणे, जीएमजीसी आणि प्रकल्प संचालक आत्मा यांनी संयुक्तपणे पेटंट ऑथॉरीटी ऑफ इंडिया, चेन्नई यांच्याकडे “अलिबाग पांढरा कांदा” चे भौगोलिक मानांकनासाठी सन 2019 मध्ये अर्ज सादर केला होता. त्याला कोरोना कालावधीमुळे उशीर झाला होता. मात्र पांढऱ्या कांद्यास भौगोलिक मानांकन सप्टेंबर 2022 मध्ये प्राप्त झाले. आता प्रकल्प संचालक आत्मा आणि पणन महामंडळ यांच्या मार्फत शेतकऱ्यांचे ” Authorised User Registration ” करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

या पांढऱ्या कांद्यामध्ये TSS-9.45, Dry Matter-6.1 (Low), Non Reducing Sugar-2.3, Pyruvic Acid-1.05, Quicertin- 0.92 (high), N-2799 mg/100 gm, P- 443 mg/100 gm, K- 1898 mg/100 gm, Ca-118.50 mg/100 gm, Na-355 mg/100 gm, Zn-3.8 mg/100 gm, Eu, Fe-33 mg/100 gm, Mn-2.65 mg/100 gm, S-2.02 mg/100 gm हे महत्वाचे घटक आहेत.

हा कांदा पातीसह काढल्यानंतर सुकविण्यात येतो व पहाटेच्या वेळी त्याची वेणी बांधली जाते नंतर वेणीसह कांदे विक्रीसाठी बाजारात येतात. त्यामुळे पानातील Absecic acid कांद्यात उतरते आणि त्याला सुप्तावस्था प्राप्त होते. या वैशिष्टयपूर्ण प्रक्रियेमुळे पांढरा कांदा न कुजता वर्षभर हवेशीर वातावरणात चांगल्या पध्दतीने टिकतो. त्यामुळे त्याला वर्षभर चांगला बाजार भाव मिळतो.

कांद्यातील कमी प्रमाणातील सल्फर घटक आणि समुद्रालगतचे खारे वारे व रेतीमय उथळ हलकी जमीन यामुळे या कांदयाला वैशिष्ट्यपूर्ण चव येते, या वैशिष्ट्यपूर्णतेमुळे त्याला भौगोलिक मानांकन मिळाले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.