मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वासाठी एकत्र आले पाहिजे. मला आदेश आल्यास दोघांना एकत्र आणण्यासाठी मी पुढाकार घेईल, असे भाजपचे नेते राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री आणि चंद्रकांत पाटील यांनी विधान केल्यामुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर बोलत असताना मंत्री दीपक केसरकर यांनी एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरे यांच्या मनातील मुख्यमंत्री असल्याचे म्हणत टोला लगावला.
नक्की काय म्हणाले दीपक केसरकर?
चंद्रकांत पाटलांच्या विधानावर बोलत असताना दीपक केसरकर म्हणाले की, मोठ्या लोकांमध्ये आपण जास्त काही बोलायचे नसते. आणि त्यांच्यामुळे मला असे वाटते की, जो काही निर्णय घ्यायचा आहे, तो त्यांनी घेतला पाहिजे. स्वत: नरेंद्र मोदींनी सांगितल्यानंतर सुद्धा ते आलेले नाहीत. मोदींना दिलेले वचन त्यांनी मोडले आहे. आणि याला मी स्वतः साक्षीदार आहे. त्याच्यामुळे मला असे वाटते, हे जर झाले, तर वरिष्ठ पातळीवरून मोदी साहेबांनी त्यांना माफ केले पाहिजे. शेवटी मोठ्या भावने लहान भावाला माफ करायला हवे.
पुढे ते म्हणाले की, ज्याप्रकारे उद्धव ठाकरे यांनी मोदींचा अपमान केला, त्यानंतर हे जुळवून घेण्याबाबत सगळे काही उद्धव ठाकरेंच्या हातात आहे. जे काही प्रयत्न आम्हाला करायचे होते, ते आम्ही केले होते. मोदींनी त्याचा चांगला असा प्रतिसाद दिला होता. परंतु हे होऊ शकले नाही. हे काळाच्या ओघात घडलेली गोष्ट आहे. आता चांगला कारभार एकनाथ शिंदे महाराष्ट्रात करतायत. आणि मुळात उद्धव ठाकरेंनीच ठरवलेले होते की, एकनाथ शिंदे यांनीच मुख्यमंत्री व्हायचे. त्यांचे म्हणणे होते की, त्यांच्यावर शरद पवारांनी दबाव आणला आणि त्यांना मुख्यमंत्री व्हावे लागले. नाहीतर मुख्यमंत्री शिंदे असले असते ना. म्हणजे त्यांच्या मनात असलेले मुख्यमंत्री महाराष्ट्रात आहेत. त्याच्यामुळे त्यांना फारस वाईट वाटू नये असे मला वाटते.
(हेही वाचा – शिवसेनेविरोधात रॅप साँग करणारा रॅपर राम मुंगासेला अटक)
Join Our WhatsApp Community