मुंबईतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सर्वोत्कृष्ट; जगातील १९ सर्वोत्तम शहरात समावेश

137

टाईम आऊट या मासिकाने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या एका यादीनुसार सर्वोत्कृष्ट सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या यादीत मुंबईचा १९वा क्रमांक लागला आहे. त्यांनी घेतलेल्या सर्व्हेनुसार ८१ टक्के मुंबईकर सांगतात की, इथली सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही दैनंदिन वापरासाठी सोईची आहे. यात मुंबईच्या लाईफलाईन रेल्वेसह बस, रिक्षा, मेट्रो यांचाही समावेश होतो. संपूर्ण देशभरातील अनेक स्मार्ट सिटीजना मागे टाकत देशातील या एकाच शहराने मानाच्या यादीत आपले स्थान पटकावले आहे.

मुंबईकर एकवेळ अन्न-पाण्याशिवाय एखाद दुसरा दिवस जगू शकतात, मात्र जीवनदायिनी रेल्वे शिवाय जगणं अशक्य आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईच्या एकूण लोकसंख्येपैकी ५१ टक्के नागरिक हे सार्वजनिक तसेच खासगी वाहनांच्या मदतीने प्रवास करतात. यातील ६० लाख प्रवासी दररोज मुंबई रेल्वेने कामाच्या ठिकाणी पोहोचतात.

जर तुम्ही पर्यटक म्हणून मुंबईत आलात आणि सर्व महत्त्वाच्या ठिकाणांना भेट दिलात तरीही तुम्ही खऱ्या अर्थाने मुंबई पाहिली आहात असे तोपर्यंत म्हणता येणार नाही, जोपर्यंत तुम्ही मुंबई लोकलने प्रवास केला नाही. खासकरून सकाळच्या वेळी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेने आणि संध्याकाळी ठाण्याच्या दिशेने लोकलमध्ये प्रचंड गर्दी असते. या वेळी कोणत्याही सार्वजनिक वा खासगी वाहनाने प्रवास करणे हे एक दिव्यच असते.

बसचे नेमके ठिकाण सांगणार चलो ॲपमुळे ट्रॅफिकमधला वेळ जरी कमी झाला नसला तरी बसची वाट पाहात तात्काळ उभे असणाऱ्यांचा मनस्पात कमी झाला आहे. या शिवाय ॲपच्या माध्यमातून शालेय प्रवास करणे शक्य झाले आहे. रेल्वेचे अधिकृत ॲप असलेले यूटीएस, यात्री यांनी प्रवास काहीसा सुखकर आणि वेगवान करायला मदत केली आहे.

सार्वजनिक वाहतुकीसाठी जगातील सर्वोत्तम शहरांची नावे काय?

१. बर्लिन, जर्मनी

२. प्राग, झेक प्रजासत्ताक

३. टोकियो, जपान

४. कोपनहेगन, डेन्मार्क

५. स्टॉकहोम, स्वीडन

६. सिंगापूर

७. हाँगकाँग

८. तैपेई, तैवान

९. शांघाय, चीन

१०. आम्सटरडॅम, नेदरलँड

११. लंडन, यूके

१२. माद्रिद, स्पेन

१३. एडिनबर्ग, यूके

१४. पॅरिस, फ्रान्स

१५. न्यूयॉर्क शहर, यूएस

१६. मॉन्ट्रियल, कॅनडा

१७. शिकागो, यूएस

१८. बीजिंग, चीन

१९. मुंबई, भारत

या निष्कर्षापर्यंत पोहोचण्यासाठी टाईम आऊट या संस्थेने वेगवेगळ्या ५० शहरांतील २०,००० हून अधिक स्थानिकांचे मत नोंदवले आहे. मुंबईचा या यादीत नंबर लागतो कारण पाचपैंकी चार स्थानिकांनी मुंबईच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे कौतुक केले.

(हेही वाचा – मुंबईत जिओ फायबर इंटरनेट सेवा खंडित करण्याचा प्रकार सुरू, काय आहे कारण?)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.