सध्या आम आदमी पक्षाचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नंतरचे मंत्री मनीष ससोदीया तिहार कारागृहात गेल्यानंतर आता मुख्यमंत्री केजरीवाल यांची अडचण वाढणार आहे. कारण सुकेश चंद्रशेखरने याने आणखी एक लेटर बॉम्ब टाकला आहे. त्यामधून त्याने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. तसेच केजरीवालांचा खेळ आता संपला आहे. ते लवकरच तिहारमध्ये येतील, असा दावा सुकेश याने केला आहे.
उत्पादन शुल्क घोटाळ्यात नाव आलेल्या बीआरएस नेत्या के. कविता यांच्यापासून अनेक मद्य व्यावसायिकांशी अरविंद केजरीवाल यांचे संबंध आहेत, असेही सुकेश याने म्हटले आहे. सुकेश चंद्रशेखरने केजरीवालांच्या चॅटचा ट्रेलर बाहेर आणला आहे. सुकेश भ्रष्टाचार आणि पैशांच्या अफरातफरीच्या गुन्ह्यात तुरुंगात आहे. त्याने काही दिवसांपूर्वी केजरीवालांचा खरा चेहरा समोर आणणार असल्याचे म्हटले होते. केजरीवाल आणि टीआरएस पार्टीचे रॅकेट असल्याचा दावा त्याने केला आहे. केजरीवालांसोबत आपली चॅटिंग झाली होती. त्यात त्यांनी १५ कोटी रुपये बीआरएस कार्यालयात पोहोचविण्यास त्यांनी मला सांगितले होते, असा दावा सुकेश याने केला आहे. टीआरएस नेत्यांना हे पैसे मिळाल्याचे देखील या चॅटमध्ये उल्लेख असल्याचे सुकेशने म्हटले आहे. हे निर्देश केजरीवाल आणि सत्येंद्र जैन सारख्या आपच्या नेत्यांनी दिले होते, असा दावा त्याने केला आहे.
(हेही वाचा राहुल गांधी, तुमचे कुटुंब धोक्यात आले; अमित शाह यांचा हल्लाबोल)
Join Our WhatsApp Community