संजय राऊत हे यांचे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या जवळचे आहेत, असा आरोप वारंवार होत आहे, आता स्वतः संजय राऊत यांनीच ते मान्य करत माझ्या आयुष्यात बाळासाहेब ठाकरे यांना जितके स्थान आहे, तितकेच शरद पवार यांचेही आहे. बाळासाहेबांनी मला उभे केले परंतु पवार माझ्यासाठी आधारस्तंभ आहेत, असे राऊत म्हणाले.
२०१९च्या विधानसभा निवडणुकीचे निकाल पूर्ण लागलेही नव्हते तेव्हा शिवसेना भवनात उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद झाली. मी तिथून थेट शरद पवार यांना भेटण्यासाठी सिल्व्हर ओकला गेलो. सरकार बनवण्यासाठी आलोय असे म्हटले. लपवले कुठे? आमच्यापुढे सर्व पर्याय खुले आहेत हे उद्धव ठाकरेंनी सांगितले. हा संदेश स्पष्ट होता असे विधान खासदार संजय राऊत यांनी केले. अहमदनगर येथे एका कार्यक्रमात खासदार संजय राऊत यांची मुलाखत घेण्यात आली. त्यावेळी ते म्हणाले की, आम्ही भाजपसोबत निवडणूक लढवली हे खरे आहे. पण निवडणूक लढवण्याआधीही आमचा काडीमोड २०१४ साली झाला होता. आम्ही एकत्र लढलो नाही. युती भाजपाने तोडली होती. देशभरात घोडा उधळला होता. त्यामुळे स्वबळावर आम्ही देश काबीज करू असं भाजपाला वाटले. जागावाटपात अडचणी निर्माण केल्या. जे शक्य नव्हते. १-२ जागांवर युती तोडली. देशात लोकशाही विकत घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. आम्ही व्यापारी आहोत असं खुले सांगतात. लोकशाहीचे प्रत्येक स्तंभ विकत घेतले आहेत. प्रत्येक गोष्टींवर त्यांचा मालकी हक्क प्रस्थापित केला आहे. भांडवलदारांच्या हाती लोकशाही चालली आहे. तपास यंत्रणाचे प्रमुख, न्यायाधीश, अधिकारी कोण असावेत हे ते ठरवतात. १४० कोटी जनता असलेल्या भारतातील लोकशाहीला खड्ड्यात घालण्याचे काम मोदी-शाह करत आहेत, असा आरोप संजय राऊत यांनी केला.
(हेही वाचा राहुल गांधी, तुमचे कुटुंब धोक्यात आले; अमित शाह यांचा हल्लाबोल)
Join Our WhatsApp Community