मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानात पाहुणचारावर दोन कोटींहून अधिक खर्च झाल्याची माहिती समोर आल्यानंतर विरोधकांनी टीकेची झोड उठवली होती. त्यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या शासकीय बंगल्यातील पाहुणचारावरील खर्चाला कात्री लावण्याचा निर्णय शिंदे-फडणवीस सरकारने घेतला आहे.
त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’ आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘सागर’ या शासकीय निवासस्थानी येणाऱ्या महत्त्वाच्या पाहुण्यांच्या खानपान सेवांसाठी पुरवठादार निश्चित करण्यात आले. वर्षा निवासस्थानी श्री सुखसागर हॉस्पिटॅलिटी, तर सागर निवासस्थानी खानपान सेवा पुरवण्यासाठी मे. छत्रधारी कॅटरर्सला कंत्राट देण्यात आले आहे. यात मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थातील खानपानासाठी अंदाजित खर्च अनुक्रमे ३.५० कोटी इतका असेल. तर उपमुख्यमंत्र्यांच्या बंगल्यातील खानपानासाठी १.५० कोटींचा खर्चाला मंजूरी देण्यात आली आहे. दोन वर्षांसाठी ही नियुक्ती करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी देण्यात येणाऱ्या विविध पदार्थांचे दर निश्चित करण्यात आले आहेत. तसेच नव्या करारानुसार कंत्राटदारांसाठी अटी आणि शर्थी लागू करण्यात आल्या आहेत. या अटीशर्थींचे उल्लघंन झाल्यास या कंत्राटदारांवर कारवाई करण्यात येणार आहे.
दरपत्रक असे…
चहा – १८
कॉफी – १३
बटाटा वडा (दोन) – २७
व्हेज थाळी (फुल) – ९५
नॉनव्हेज थाळी (फुल) – ९८
स्पेशल व्हेज बुफे लंच – ३२५
ब्रेकफास्ट बुफे – ४५
व्हेज बुफे डिनर – १६०
नॉनव्हेज बुफे डिनर – १६०
(हेही वाचा – शरद पवार माझ्यासाठी आधारस्तंभ; संजय राऊत यांची कबुली)
Join Our WhatsApp Community