शिंदे सरकारला नको महापालिकेच्या विकासकामांचे श्रेय?

मुंबई महापालिकेच्या माध्यमातून सध्या सुशोभिकरणाच्या प्रकल्पांची कामे सुरु असून यातील ५० टक्क्यांपेक्षा अधिक प्रकल्पांची कामे पूर्ण झाली आहे.

257

मुंबई महापालिकेत सध्या प्रशासक नियुक्त असून नगरसेवक नसल्याने कोणत्याही विकासकामांचे व प्रकल्पांचे भूमिपुजन तसेच उद्घाटन हे राज्यातील सरकारमधील मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांसह पालकमंत्री यांच्या हस्ते किंवा उपस्थित केला जातो. परंतु राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सरकार असले तरी मुंबई महापालिकेच्यावतीने लोकार्पण केल्या जाणाऱ्या अनेक विकास प्रकल्पांची उद्घाटने करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून केला जात नाहीत. त्यामुळे यापूर्वीच्या महापालिकेतील सत्ताधारी शिवसेना पक्षाच्या काळात केलेल्या कामांचे श्रेय घेण्याची इच्छा शिंदे सरकारची दिसत नाही.

bmc1 1

मुंबई महापालिकेच्या माध्यमातून सध्या सुशोभिकरणाच्या प्रकल्पांची कामे सुरु असून यातील ५० टक्क्यांपेक्षा अधिक प्रकल्पांची कामे पूर्ण झाली आहे. परंतु या सुशोभिकरणाच्या प्रकल्प कामांव्यतिरिक्त यापूर्वी हाती घेतलेली विविध विकास कामे तसेच प्रकल्पांची कामे पूर्णत्वास येऊन त्यांचे लोकार्पण हे कोणत्याही प्रकारचा गाजावाजा न करता त्या सेवा लोकांसाठी खुल्या करून दिल्या आहेत. मागील गुढीपाडव्याच्या दिनानिमित्त भायखळा येथील अण्णाभाऊ साठे नाट्यगृह लोकांसाठी खुले करण्यात आले. तसेच दहिसर व मालाड येथील दोन्ही जलतरण तलावांचे १ एप्रिलपासून उद्घाटनाशिवाय लोकार्पण करण्यात आले.

(हेही वाचा उद्धव ठाकरेंनी निवडणूक लढावी, त्यांच्याविरोधात मी लढायला तयार; नवनीत राणांचे आव्हान)

सरकारच्या निर्देशानुसारच प्रशासनाचे निर्णय

आजवर अशा प्रकारच्या मोठ्या विकास सुविधेचे लोकार्पण करताना महापालिका प्रशासनाच्यावतीने सरकारमधील मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री आदींना विनंती करून त्यांच्या उपस्थितीत उद्घाटन केले जाते. त्यामुळे प्रशासक नियुक्त असल्याने महापालिकेवर पूर्णपणे सरकारचा वरदहस्त असल्याने सरकारमधील मंत्र्यांच्या निर्देशानुसार प्रशासनाला पुढील विकासकामे तसेच प्रकल्प लोकांना खुली करुन देता येतात. त्यामुळे सध्या प्रशासनाच्या माध्यमातून ज्याप्रकारे विकासकामे तसेच प्रकल्प लोकांना उद्घाटनाशिवाय खुले करून दिले जात असल्याने सरकारच्या निर्देशानुसारच प्रशासन हे पाऊल टाकत असल्याची माहिती मिळत आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सुशोभिकरणाच्या कामांचे व विविध प्रकल्पांचे भूमिपुजन केले. परंतु जी विकास कामे पूर्णत्वास जात आहेत, त्यांचे उद्घाटन करण्यासाठी शिंदे सरकार अधिक पुढाकार घेताना दिसत नाही. यापूर्वीच्या सत्ताधाऱ्यांच्या कालावधीमध्ये मंजूर झालेली विकास कामे व प्रकल्प कामे आज पूर्णत्वास येत आहेत, त्यांचे उद्घाटन करून त्यांचे फुकटचे श्रेय घेण्याची इच्छा मुख्यमंत्री शिंदे यांची दिसत नाही.

मात्र, एका बाजुला नाट्यगृह तसेच जलतरण तलावांचे उद्घाटन करण्यासाठी पुढाकार न घेणाऱ्या शिंदे सरकारमधील मंत्र्यांसह पदाधिकाऱ्यांना मुंबई सुशोभिकरणाअंतर्गत हाती घेतलेल्या प्रकल्प कामांपैकी ५० टक्क्यांहून अधिक कामे पूर्ण होऊन त्यांचे लोकार्पण करण्यासाठी उद्घाटनाकरता पुढाकार घेत यांचे श्रेयही घेण्याचा प्रयत्न होत नाही. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिंदेला आपल्या संकल्पनेतील विकास कामांचेही श्रेय घेता येत नाही,असे स्पष्ट दिसून येत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.