AI प्रणालीचा वापर करण्यामध्ये भारतीयांची संख्या जास्त

176

सध्याच्या काळात आर्टिफिशल इंटेलिजन्स (AI) ची साधने वापरण्यामध्ये भारतीयांचे प्रमाण सर्वात जास्त असल्याची माहिती मायक्रोसॉफ्टचे मुख्य विपणन आधिकारी युसुफ मेंहंदी यांनी सांगितले. भारतीय लोक सर्वात जास्त मायक्रोसॉफ्टच्या नवीन साधनांचे वापरकर्ते आहेत. आमच्याकडे १०० अब्ज रोजचे बिंग वापरकर्ते आहेत, तसेच आम्ही १६९ देशात असून, भारत जगातल्या प्रमुख तीन मार्केटिंग देशात येतो, खरतर भारतात AI च्या मदतीने चांगल्या प्रतिमाही केल्या जातात, असेही मेंहंदी म्हणाले.

मायक्रोसॉफ्टच्या एका वरिष्ठ आधिकाऱ्याने महत्त्वाची गोष्ट अधोरेखित केली. व्हिजुअल शक्ती वाढवण्यासाठी नॉलेज कार्डचा वापर करण्यात येतो, ज्यामुळे अधिक चांगली दृश्ये तुम्हाला बघण्यात येतात, तसेच बॉलिवूड अभिनेञी कियारा अडवाणीला भारतीय बाजारपेठेत नॉलेज कार्डचा वापर करून सर्वाधिक सर्च केले गेले.

(हेही वाचा उद्धव ठाकरेंनी निवडणूक लढावी, त्यांच्याविरोधात मी लढायला तयार; नवनीत राणांचे आव्हान)

मायक्रोसॉफ्टच्या नव्या बिंगला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतोय तसेच लोक फक्त उत्तर नाही तर चॅट आणि सर्चच्या बाबतीत खूश आहेत. हे यामागील महत्त्वाचे आहे. कारण हा फरक आहे आमच्यात आणि गुगलमध्ये, असेही मेंहेदी म्हणाले. ते पुढे असेही म्हणाले की, मायक्रोसॉफ्ट AI चॅटबॉट आणि सर्चला वेगळे मानते. लोकांचा या बद्दलचा अभिप्राय सकारात्मक आहे. मेंहेंदी पुढे म्हणाले की, अजून काही क्षेञ आहेत जिथे सुधारणांची गरज आहे. गणिताचे प्रश्न, वैयक्तिक लोकांबद्दल शोध यासारख्या गोष्टी, आम्ही अजूनही तेथे अधिक काम करत आहोत, असही ते पुढे म्हणाला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.