यूट्युब चॅनल सब्सक्राईबच्या नावाखाली महिलेची फसवणूक

111

वर्क फ्रॉम होम अजूनही कित्येक ठिकाणी होताना आपल्याला दिसतं. इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्या ही मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. यामाध्यमातून लोकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्यांचे प्रमाणही वाढलं. सायबर गुन्हेगारीचा वाढता प्रभाव ही भारतासाठी डोकेदुखी ठरतेय. सायबर साक्षरतेतही भारत मागे असल्याचे दिसते. याचंच एक ताजं प्रकरण गुरुग्राममध्ये पाहायला मिळालं आहे.

यूट्युब चॅनेल सब्सक्राईब करण्याच्या बहाण्याने एका महिलेला फसवल्याची घटना समोर आली आहे. सायबर ठगांनी महिलेला ८.२ लाखांचा गंडा घातला. वर्क फ्रॉम होमच्या नावाखाली ही फसवणूक करण्यात आल्याचे उघडकीस आले. महिलेने गुरुग्राम पोलिसात तक्रार दाखल केली असून, या महिलेचे नाव सरीता एस. आहे. ती गुरुग्राममधील सेक्टर ४३ परिसरात राहते.

(हेही वाचा समृद्धी महामार्गावरुन जाणार असाल तर आधी ‘हे’ वाचा, नाहीतर ठोठावला जाऊ शकतो २० हजारांचा दंड)

फसवणुकी कशी झाली?

व्हॉट्सअ‍ॅपवर एक मेसेज आला होता, ज्यामध्ये वर्क फ्रॉम होमद्वारे पैसे कमवा असे म्हटले होते. यातून सब्स्क्रिप्शनच्या नावाखाली पैसे उकळले गेले. हा मेसेज पाठवणाऱ्या व्यक्तीने महिलेला तो अ‍ॅडनेट ग्लोबल मार्केटिंग कंपनीचा असिस्टंट मॅनेजर असल्याचे सांगितले होते, असे महिलेने फिर्यादीत म्हटले आहे. टेलिग्रामचा वापर फसवणुकीसाठी करण्यात आला. मी दोन चॅनेल्सची मेंबरशिप घेतली. त्यानंतर मला लैला नावाच्या एका रिसेप्शनिस्टचा फोन आला. तिने मला माझा टेलिग्राम आयडी शेअर करण्यास सांगितलं. मी लैलाला टेलिग्रामवर एक मेसेज पाठवला. त्यानंतर मी आणखी तीन चॅनेल्सची मेंबरशिप घेतली. त्यासाठी १५० रुपये भरले. त्यानंतर मला एका टेलिग्राम ग्रुपमध्ये जोडलं. यामध्ये १८० सदस्य आधीपासूनच होते. हे सर्व युजर्स वेगवेगळे टास्क करत होते असे सरिता म्हणाली. या टास्कच्या माध्यमातून तिचे ८.२० लाख रुपये लुबाडण्यात आले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.