विमान प्रवासात मद्यधुंद प्रवाशांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. दिल्लीहून बंगळुरूला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानात एका मद्यधुंद प्रवाशाने गोंधळ घालत विमानाचे इमर्जन्सी डोअर उघडण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. दरम्यान बंगळुरू विमानतळावर पोहचल्यानंतर या प्रवाशाला सीआयएसएफच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
( हेही वाचा : अजित पवार पुन्हा नॉट रिचेबल? अंजली दमानियांचे सूचक ट्वीट )
इंडिगोच्या दिल्ली-बंगळुरू विमानातील घटना
यासंदर्भात इंडिगो एअरलाइन्सने जारी केलेल्या निवेदनात नमूद केल्यानुसार विमान 6ई- 308 दिल्लीहून बंगळुरूला जात असताना त्यामध्ये प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाने मद्यधुंद अवस्थेत आपत्कालीन दरवाजाचा फ्लॅप उघडण्याचा प्रयत्न केला. मद्यधुंद प्रवाशाचे वर्तन पाहून क्रू मेंबर आणि वैमानिक सर्तक झाले. त्यांनी प्रवाशाला वॉर्निंग दिली. त्यानंतर विमान बंगळुरूला सुरक्षित लॅण्ड केल्यावर या संबंधित प्रवाशाला सीआयएसएफच्या ताब्यात देण्यात आले आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरू असून या ४० वर्षीय मद्यधुंद प्रवाशाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Join Our WhatsApp Community