रविवार दिनांक ९ एप्रिल २०२३ रोजी मध्य रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे. त्यामुळे रविवारी बाहेर पडण्यापूर्वी प्रवाशांची मेगाब्लॉकचे वेळापत्रक पाहून प्रवास करावा असे आवाहन करण्यात आले आहे.
( हेही वाचा : ‘बेस्ट’ची नाईट शिफ्ट बंद! आता रात्रीचा प्रवास करणाऱ्यांच्या खिशाला बसणार कात्री )
मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावर मेगाब्लॉक
- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.३४ ते दुपारी ३.३६ वाजेपर्यंत पनवेल/बेलापूर/वाशीकडे जाणाऱ्या हार्बर मार्गावरील गाड्या आणि वाशी/बेलापूर/पनवेल येथून सकाळी १०.१६ ते दुपारी ३.४७ वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकडे जाणाऱ्या हार्बर मार्गावरील गाड्या रद्द राहतील.
- ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई – कुर्ला आणि पनवेल – वाशी या भागांत विशेष लोकल चालविण्यात येतील.
- हार्बर मार्गावरील प्रवाशांना ठाणे – वाशी/नेरुळ मार्गे ट्रान्सहार्बर मार्गावरून सकाळी १०.०० ते सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत प्रवास करण्याची परवानगी असेल.
- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण दरम्यान मेन लाईनवर मेगाब्लॉक नाही.
- हे मेंटेनन्स मेगाब्लॉक पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक आहेत. त्यामुळे प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाने दिलगिरी व्यक्त केली आहे.