मुंबईत ३ अतिरेकी दाखल! पोलीस नियंत्रण कक्षाला फोन आल्याने खळबळ

182

तीन अतिरेकी मुंबईत आल्याचा मुंबई पोलीस नियंत्रण कक्षात फोन आल्याने एकच खळबळ उडाली आहे. दुबई वरून शुक्रवारी पहाटे तीन अतिरेकी आल्याचे आणि त्यांचा संबंध पाकिस्तानशी असल्याचा या कॉलरचा दावा आहे.

( हेही वाचा : देवदर्शन करून पुण्याकडे जाणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला! लक्झरी बसचा भीषण अपघात, ११ प्रवासी गंभीर जखमी )

राज ठोंगे नावाच्या एका व्यक्तीने मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षात फोन करून ही माहिती दिली आहे. ठोंगे यांनी यापैकी एका व्यक्तीचा मोबाईल नंबर आणि गाडीचा नंबरही पोलिसांना दिला आहे. यातील एकाचे नाव मुजीब सय्यद असे असून, या तिघांचाही बेकायदेशीर व्यवसाय असल्याची माहिती राज ठोंगे यांनी दिली आहे. या आधारावर पोलीस सध्या अधिक तपास करत आहेत.

दुबईवरुन शुक्रवारी पहाटे हे तीन अतिरेकी भारतात आल्याचे राज ठोंगे यांनी म्हटलं आहे. तसेच यांचा पाकिस्तानशी संबंध असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.