दक्षिण मध्य मुंबईतला महत्त्वाचा विभाग असलेला दादर मधली छत्रपती शिवाजी महाराज उद्यान (शिवाजी पार्क) परिसर कोणत्या ना कोणत्या राजकीय, सामाजिक कारणांमुळे सतत चर्चेत असतो. पण याच मैदानातील धुळीच्या प्रदुषणामुळे नागरिकांना श्वसानाच्या त्रासांचा सामना करावा लागत असल्याचे समोर आले होते. त्यानंतर मैदान समतल करून मैदानामध्ये मातीचा भराव टाकून त्यावर हिरवळ तयार करत धुळीचे प्रदूषण कमी करण्याचा प्रयत्न तत्त्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला. यासाठी तीन वर्षांसाठी एक कोटीच कंत्राटही देण्यात आले होते. परंतु शिंदे-फडणवीस सरकारकडून हे कंत्राट रद्द करत खासगी कर्मचाऱ्यांच्या मदतीने देखभालीचे काम सुरू करण्यात आले. पण त्याचा परिणाम एवढा दिसून आलेला नसल्याने स्थानिक तीव्र नाराज आहेत. पण आता शिवाजी पार्क प्रदूषणमुक्त करण्यासाठी शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी पुढाकार घेतला आहे. सोमवारी, १० एप्रिलला स्थानिक नागरिकांशी खासदार शेवाळे थेट संवाद साधणार आहेत.
छत्रपती शिवाजी पार्क महाराज पार्क प्रदूषण समस्या, तसेच कायदा आणि सुव्यवस्था यांच्यासह इतर नागरी समस्यांवर सकारात्मक तोडगा काढण्यासाठी थेट खासदार राहुल शेवाळे संवाद साधणार आहेत. स्थानिक लोकप्रतिनिधी, वरिष्ठ प्रशासकीय आधिकारी आणि सुजाण नागरिकांना एकञ आणत हे प्रगतिशील व्यासपीठाचे आयोजन करण्यात आले आहे. यामाध्यमातून स्थानिक नागरिकांना आपली समस्या, मत मांडण्याची संधी मिळणार आहे.
या थेट संवादाचे पोस्टर शिवाजी पार्कात जागोजागी लागलेले आहेत. तसेच या कार्यक्रमाला स्थानिक आमदार सदा सरवणकर उपस्थित राहणार आहेत. हा संवाद सोमवार, १० एप्रिलला सायंकाळी ६ वाजता शिवाजी पार्क जिमखाना येथे होणार आहे.
(हेही वाचा – सर्वसामान्यांना खुशखबर! CNG आणि PNG च्या दरात कपात, नवे दर किती?)
Join Our WhatsApp Community