हत्तींचे संरक्षण ही राष्ट्रीय जबाबदारी! ‘प्रोजेक्ट एलिफंटची’ काय आहेत मुख्य उद्दिष्टे?

137

भारतीय परंपरेत हत्तींचा सर्वाधिक आदर केला जातो. हत्तीला समृद्धीचे प्रतीक मानले गेले असून हत्ती हा भारताचा राष्ट्रीय वारसा प्राणी आहे. म्हणून, आपला राष्ट्रीय वारसा जतन करण्यासाठी हत्तींचे संरक्षण करणे हा आपल्या राष्ट्रीय जबाबदारीचा एक महत्त्वाचा भाग आहे, असे प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केले. त्या काझीरंगा राष्ट्रीय उद्यानात गज उत्सव- 2023 चे उद्घाटन प्रसंगी बोलत होत्या.

( हेही वाचा : नाना पटोलेंनी न विचारता विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यामुळे मविआचे सरकार पडले – आशिष देशमुख)

हत्तींच्या संवर्धनाचा आपल्या सर्वांना फायदा होईल आणि हवामान बदलाच्या आव्हानांना तोंड देण्यासही मदत होईल. तसेच हत्ती हा अतिशय बुद्धिमान आणि संवेदनशील प्राणी मानला जातो. आपण प्राणी आणि पक्ष्यांकडून निःस्वार्थ प्रेमाची भावना शिकू शकतो, असे राष्ट्रपती म्हणाल्या.

प्रोजेक्ट एलिफंट

‘मानव आणि हत्ती संघर्ष’ हा अनेक शतकांपासूनचा मुद्दा आहे आणि जेव्हा आपण या संघर्षाचे विश्लेषण करतो तेव्हा असे दिसून येते की हत्तींच्या नैसर्गिक अधिवासात किंवा हालचालींमध्ये निर्माण झालेला अडथळा हे त्याचे मूळ कारण असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे या संघर्षाची जबाबदारी मानवी समाजाची आहे. हत्तींचे संरक्षण करणे, त्यांच्या नैसर्गिक अधिवासाचे संवर्धन करणे आणि हत्तींच्या कॉरिडॉरला मानवी अडथळ्यांपासून मुक्त ठेवणे ही ‘प्रोजेक्ट एलिफंटची’ मुख्य उद्दिष्टे आहेत. मानव-हत्ती संघर्षाशी संबंधित समस्या सोडवणे हे देखील या प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे. ही सर्व उद्दिष्टे एकमेकांशी संबंधित असल्याचे त्या म्हणाल्या.

आसामचे काझीरंगा आणि मानस राष्ट्रीय उद्यान हे केवळ भारताचेच नव्हे तर संपूर्ण जगासाठी अमूल्य वारसा स्थान आहे. प्रोजेक्ट एलिफंट आणि गज-उत्सव यशस्वी होण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न केले पाहिजे असे राष्ट्रपती म्हणाला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.