छत्रपती संभाजीनगर दंगलप्रकरणी आतापर्यंत ५८ जण गजाआड

146

छत्रपती संभाजीनगरातील किराडपुरा भागात झालेल्या दंगलीतील आणखी दोन आरोपींच्या विशेष तपास पथकाने मुसक्या आवळल्या. त्यांना १० एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी डी.एम. भंडे यांनी शनिवारी ८ एप्रिल रोजी दिले. शेख मुजम्मील शेख रफिक (वय २३) आणि शेख समीर शेख सलीम (वय २४, दोघे राहणार रहेमानिया कॉलनी, किराडपुरा) अशी आरोपींची नावे आहेत. गुन्ह्यात आतापर्यंत ५८ आरोपींना गजाआड करण्यात आले आहेत.

गुन्हा हा गंभीर स्वरुपाचा आहे. अटक आरोपींकडून त्यांच्या साथीदारांची नाव निष्पन्न होत आहेत, आणखी नावे निष्पन्न होण्याची शक्यता आहे. गुन्ह्यात वापरलेले लाठ्या-काठ्या, सळ्या हस्तगत करायच्या आहेत. त्याचप्रमाणे गुन्हा करण्यासाठी आरोपींना कोणी चिथावणी दिली होती का तसेच गुन्हा करण्यामागे आरोपींचा नेमका हेतु काय होता याचा देखील तपास बाकी असल्याने आरोपींना पोलीस कोठडी देण्याची विनंती सहायक सरकारी वकील भाग्यश्री संचेती-डागळे यांनी न्यायालयाकडे केली होती.

तथापि, या प्रकरणात शहेबाज खान शाहनवाज खान (वय २७, राहणार किराडपुरा), जावेद खान इब्राहिम खान (वय ३४, राहणार नेहरुनगर, कटकटगेट), शेख इस्माईल शेख इब्राहिम (वय ३८, रा. अल्तमश कॉलनी, सेंट्रलनाका रोड, जसवंतपुरा), सय्यद शकील सय्यद सादेक (वय ३५, राहणार मिसारवाडी) या आरोपींना ५ ते ६ एप्रिल दरम्यान पोलिसांनी अटक केली होती. तर न्यायलयाने त्यांना आजपर्यंत पोलीस कोठडीत ठोठावली होती. कोठडीची मुदत संपल्याने त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

(हेही वाचा – मध्य रेल्वे सुरक्षा दलाने गेल्या वर्षात ८६ व्यक्तींचा वाचवला जीव)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.