प्रभू श्रीरामाचे आणि हनुमानाचे दर्शन घेऊन आम्ही धन्य झालो, जो श्रीरामकी बात करेगा वही देशपर राज करेगा. रामाला माननारे एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले आहेत. आता श्रीरामाला माननारे सरकार आले आहे. जे श्रीरामाच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह लावत होते, रामाचा जन्म अयोध्येत झाला याचा पुरावा मागत होते, ते घरी बसले आणि जे रामाला मानत होते ते सरकारमध्ये आले आहेत. हा राम, हनुमानाचा महिमा आहे, असे उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
आयोध्येत श्रीरामाची महाआरती केल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे हनुमान गढी येथे आले आणि त्यांनी तिथे हनुमानाचे दर्शन घेतले. त्यावेळी भाजपचे खासदार बृजभुषण सिंग उपस्थित होते. त्याआधी महाआरतीनंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी माध्यमांशी बोलतांना श्रीरामाला राज्य सुजलाम सुफलाम करण्याचे साकडे घातले आहे. अयोध्येत श्रीरामाचे मंदिर व्हावे, अशी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे स्वप्न पूर्ण केले आहे. येथून श्रीरामाचे आशिर्वाद घेऊन आम्ही महाराष्ट्रात जाणार आहोत आणि मोठ्या उत्साहात काम करणार आहोत, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
(हेही वाचा cm eknath shinde ayodhya visit : राज्य सुजलाम सुफलाम होण्याचे श्रीरामाला साकडे घातले – मुख्यमंत्री शिंदे)
Join Our WhatsApp Community