कोकण रेल्वे सुसाट! उन्हाळ्यात गावी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी जादा गाड्या

115

कोकण रेल्वे मार्गावरील गाड्यांना होणारी गर्दी लक्षात घेऊन नियमित गाड्यांबरोबर आणखी काही विशेष गाड्या जाहीर करण्यात आल्या आहेत.

( हेही वाचा : आसामचे मुख्यमंत्री दाखल करणार राहुल गांधींविरोधात याचिका )

उन्हाळी हंगामात कोकण रेल्वे मार्गावरील गाड्यांना मोठी गर्दी होते. याआधीच काही समर स्पेशल गाड्या जाहीर केलेल्या असताना त्यामध्ये आता आणखी दोन गाड्यांची भर पडली आहे.

लोकमान्य टिळक टर्मिनस ते करमळी

  • लोकमान्य टिळक टर्मिनस ते करमळी ही गाडी १५ एप्रिल ते ३ जून २०२३ या कालावधीत दर शनिवारी सोडण्यात येणार आहे. ही गाडी रात्री एक वाजून दहा मिनिटांनी सुटून त्याच दिवशी दुपारी दोन वाजून ३५ मिनिटांनी पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी त्याच दिवशी सायंकाळी चार वाजून वीस मिनिटांनी सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे तीन वाजून ४५ मिनिटांनी लोकमान्य टिळक टर्मिनसला पोहोचेल.
  • ही गाडी ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड आणि थिविम स्थानकांवर थांबेल.

पुणे ते एर्नाकुलम

  • दुसरी विशेष गाडी पुणे ते एर्नाकुलम दरम्यान सुपरफास्ट म्हणून धावणार आहे. ही गाडी १३ एप्रिल ते २५ मे २०२३ या कालावधीत आठवड्यातून एकदा धावणार आहे. ही गाडी दर गुरुवारी सायंकाळी सहा वाजून ४५ मिनिटांनी सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सायंकाळी सहा वाजून ५० मिनिटांनी एर्नाकुलमला पोहोचेल. तिचा परतीचा प्रवास शुक्रवारी रात्री अकरा वाजून पंचवीस मिनिटांनी सुरू होईल.
  • ही गाडी लोणावळा, पनवेल, रोहा, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, सावंतवाडी रोड, मडगाव स्टेशनवर थांबणार आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.