आयपीएल फिवर एव्हाना आता सगळीकडेच दिसतोय. आरसीबीचा स्टार बॅटर विराट कोहली सध्याच्या काळात कमालीच्या फॉर्ममध्ये आहे. आरसीबीच्या पहिल्याच मॅचमध्ये विराटने ८२ धावांची सुरेख बारी खेळली. आणि पुन्हा एकदा चाहत्यांची मन जिंकली. त्याने आणि फॅफ डयु प्लेसीसने केलेल्या ओपनिंग पार्टनरशीपमुळे आरसीबीला मुंबईवर सहज विजय मिळवता आला.
गेल्या तीन ते चार वर्षांपासून विराट ओपनिंग बॅटिंग करतोय आणि रन्स बनवून आरसीबीला जिंकून पण देतोय. अशातच भारताचा माजी बॉलर इरफान पठाणने एक विधान केले आहे.
काय म्हणाला इरफान?
इरफान म्हणाला की, कोहली पूर्ण आयपीएल याच पद्धतीने खेळेल याची कोणतीही खाञी देता येत नाही. त्याच बरोबर तो एकटा आरसीबीला सगळ्या मॅचेस जिंकून देऊ शकत नाही. तसेच आरसीबीच्या इतर बॅटस्मनने सुद्धा तयार असले पाहिजे आव्हान स्विकारून खेळवले पाहिजे. त्यामुळे कोहलीने ओपनिंग करू नये, असेही इरफानने सांगितले.
आरसीबीचा मिडल ऑर्डर कमजोर आहे आणि त्याचाच फायदा समोरची टिम घेईल. तसेच जर विरोधी संघाने पावरप्ले मध्ये विकेट घेतले तर आरसीबीला खूप मोठ्या समस्येला सामोरे जावे लागेल, असे ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटर टॉम मूडी म्हणाला.
दरम्यान सोमवारी बॅंगलोरच्या चिन्नस्नामी स्टेडियमवर आरसीबी आणि लखनऊ सुपर जायंटचा सामना होणार आहे. आरसीबीचे बॅटस्मन आणि लखनऊचे बॉलर कशी कामगिरी करतात हे बघणे महत्त्वाचे ठरेल.
(हेही वाचा – IPL 2023: श्रेयस अय्यरच्या जागी कोलकाता संघात आला ‘हा’ नवा खेळाडू)
Join Our WhatsApp Community