राज्य सरकारचा शेतकऱ्यांना मोठा दिलासा! २८ जिल्ह्यांना एकूण १७७ कोटींची मदत जाहीर

109

राज्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून सतत सुरू असलेल्या पावसामुळे बळीराजाचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. दरम्यान या संपूर्ण परिस्थितीची मुख्यमंत्र्यांनी सोमवारी पाहणी केली आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर पंचनामे करून आर्थिक मदत दिली जाईल अशी ग्वाही दिली. अखेर पाहणी दौऱ्यानंतर या सर्व शेतकऱ्यांना शिंदे-फडणवीस सरकारने मोठा दिलासा दिला आहे.

( हेही वाचा : धक्कादायक! वडिलांनी मोबाईल फोन काढून घेतल्यावर १५ वर्षीय मुलीने केली आत्महत्या )

मार्चची भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच पोहोचणार असून मार्चमधील अवकाळी पावसाची भरपाई सरकारकडून वितरीत करण्यात आली आहे. शिंदे फडणवीस सरकराने २८ जिल्ह्यांना एकूण १७७.८० कोटींचा निधी दिला आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री कार्यालयाकडून ट्वीट सुद्धा करण्यात आले आहे. तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे तातडीने पंचनामे करावेत अशा सूचना संबंधित तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायकांना मुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्या आहेत.

  • अमरावती विभाग – २४ कोटी ५७ लाख ९५ हजार,
  • नाशिक विभाग- ६३ कोटी ९ लाख ७७ हजार,
  • पुणे विभाग- ५ कोटी ३७ लाख ७० हजार,
  • छत्रपती संभाजी नगर- ८४ कोटी ७५ लाख १९ हजार.
  • एकूण निधी- १७७ कोटी ८० लाख ६१ हजार

https://twitter.com/CMOMaharashtra/status/1645424198817574912

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.