मंत्रालयात टपाल घेऊन येणाऱ्या नागरिकांना गेटवरच रोखणार; गर्दी कमी करण्यासाठी निर्णय

86

मंत्रालयात पत्रव्यवहारासाठी टपाल घेऊन येणाऱ्या नागरिकांना यापुढे मंत्रालयाच्या गेटवरच रोखले जाणार आहे. गेल्या काही महिन्यांत मंत्रालयात गर्दी वाढू लागल्याने प्रशासकीय यंत्रणेवर प्रचंड ताण पडू लागला आहे. त्यामुळे गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

( हेही वाचा : स्वच्छता मोहिमेनंतरही एसटी बसस्थानके अस्वच्छ का? दुरावस्थेची छायाचित्रे हिंदु जनजागृती समितीकडून महामंडळाला सादर )

या निर्णयानुसार, यापुढे टपाल घेऊन येणाऱ्या नागरिकांना संबंधित मंत्री किंवा विभागांकडे जाऊन पत्र देण्याऐवजी मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावरच टपाल द्यावे लागणार आहे. सामान्य नागरिकांच्या टपालावर जलद गतीने कार्यवाही करण्यासाठी मंत्रालयात मध्यवर्ती टपाल केंद्र (सेंट्रल रजिस्ट्री यूनिट) सुरू करण्यात येणार आहे. या युनिटच्या माध्यमातून पत्रांचे स्कॅनिंग होणार असून नेमके पत्र कुठल्या विभागापर्यंत पोहोचले, याची माहिती मिळणार आहे.

स्वीकारलेले टपाल स्कॅन करून संबंधित प्रशासकीय विभागाच्या नोंदणी शाखेस ई-ऑफिसदारे ऑनलाइन पाठविण्यात येईल. याकरिता मध्यवर्ती टपाल केंद्रातील विभागांकरिता स्वतंत्र ई-खाते एनआयसी मार्फत तयार करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. शासनाचा कारभार पारदर्शक होण्यासाठी मंत्रालयातील सर्व प्रशासकीय विभागात ई- ऑफिस होण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्यात येत असून, शासनाचा कारभार हा लवकरच कागद विरहित करण्याचा शासनाचा मानस असल्याची माहिती सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी यांनी दिली.

‘आपले सरकार’ पोर्टलवर आणखी १२४ सेवा

‘आपले सरकार’ वेब पोर्टलच्या माध्यमातून शासनाच्या ५९१ सेवा पैकी ३८७ सेवा नागरिकांना ऑनलाइन उपलब्ध करून दिल्या जातात. शासनाच्या जास्तीत जास्त सेवा लोकाभिमुख करण्यासाठी आपले सरकार पोर्टलमध्ये आणखी १२४ सेवांचा समावेश केला जाणार आहे. त्याचबरोबर नागरिकांना आपले अर्ज दाखल केल्यापासून सेवा सहज मिळाव्यात यासाठी मोबाईल अॅपदेखील सुरू करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.