गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकारणात बऱ्याच घडामोडी घडतांना दिसत आहे. तसेच महाविकास आघाडीमधील मतभेद देखील सध्या चर्चेत आहेत.याच पार्श्वभूमीवर मंगळवारी, ११ एप्रिल रोजी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात महत्वाची बैठक पार पडणार आहे. त्यासाठी ठाकरे सिल्वर ओकवर दाखल झाले आहेत.
ही बैठक सिल्वर ओक येथे होणार असून शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यासह राष्ट्रवादी आणि ठाकरे गटातील काही वरिष्ठ मंडळी देखील उपस्थित राहणार आहेत. विशेष म्हणजे या बैठकीत काँग्रेस पक्षातील एकही नेता हजर राहणार नसल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे या बैठकीत नेमक्या कुढल्या मुद्द्यावर चर्चा होईल याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून आहे.
(हेही वाचा मोदींची पदवी मागणाऱ्या ‘आप’चे दोन डझनहून अधिक आमदार विनापदवीधर!)
उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनाम्यावरून शरद पवारांनी केलेल भाष्य, सावरकरांचा मुद्दा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पदवीच्या मुद्यावर ठाकरे यांनी मोदींवर केलेली टीका मात्र पवारांनी केलेले समर्थन, अदानी यांचे पवारांनी केलेले समर्थन अशा प्रकारे या मुद्द्यांवर मविआमध्ये मतभेद दिसून आले आहे. या बैठकीत याच सर्व मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे, तसेच येणा-या निवडणुका लक्षात घेऊन शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात यावरही चर्चा होण्याची शक्यता आहे.
Join Our WhatsApp Community