आपल्याकडे सतत डॉक्टरांच्या अक्षरावरून विनोद केले जातात. एखाद्याचे अक्षर वाचता आले नाही तर तुझं अक्षर डॉक्टर सारखं आहे असं आपण सहज बोलून जातो. मात्र एका सर्वेक्षणानुसार डॉक्टरांच्या ह्याच अक्षरामुळे जगातील बऱ्याच माणसांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.
नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्स इन्स्टिट्यूटच्या २००६ च्या एका सर्वेक्षणानुसार डॉक्टरांच्या खराब अक्षरामुळे दरवर्षी सुमारे ७ हजार लोकांचा मृत्यू होतो. तसेच अमेरिकेत दरवर्षी वैद्यकीय चुकांमुळे सुमारे ४.५ लाख लोकांचा मृत्यू होतो. हा आकडा फार जुना असून आतापर्यंत यामध्ये भर पडण्याची शक्यता आहे. याच गोष्टीच्या पार्श्वभूमीवर ओडिसा उच्च न्यायालयाने डॉक्टरांना सर्वांना समजेल अशा अक्षरात लिहिण्याचा सल्ला दिला आहे.
(हेही वाचा मोदींची पदवी मागणाऱ्या ‘आप’चे दोन डझनहून अधिक आमदार विनापदवीधर!)
Join Our WhatsApp Community