मुंबईकरांनो लक्ष द्या! मध्य रेल्वे मार्गावर विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक, प्रवाशांची होणार गैरसोय

135

कर्जत ते खोपोलीदरम्यान रेल्वेच्या फेऱ्या कमी असल्याने प्रवाशांची आधीच गैरसोय होते परंतु आता मेगाब्लॉकमुळे नागरिकांच्या त्रासात आणखी भर पडणार आहे. कर्जत यार्डमध्ये बदल करण्यासाठी आणि आवश्यक कामे करण्यासाठी मध्य रेल्वेने कर्जत ते खोपोली घाटमार्गादरम्यान तीन दिवसांचा ब्लॉक घोषित केला आहे. या ब्लॉक कालावधीत दोन लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.

( हेही वाचा : बिहारच्या अररियामध्ये 4.3 तीव्रतेचा भूकंप )

मेगाब्लॉक – १

मध्य रेल्वे मार्गावर १२ एप्रिल २०२३ रोजी कर्जत यार्डात स्थानकावर OHE संरचना उभारण्यासाठी आणि लोड हस्तांतरणासाठी घाट विभाग ते कर्जतपर्यंत सकाळी १०.५० ते दुपारी १.५० पर्यंत विशेष वाहतूक आणि पॉवर ब्लॉक असणार आहे.

मेगाब्लॉक – २

तसेच मध्य रेल्वे मार्गावर १४ एप्रिल २०२३ रोजी सुद्धा घाट विभाग ते कर्जतपर्यंत दुपारी १.४५ ते दुपारी ३.४५ पर्यंत विशेष वाहतूक आणि पॉवर ब्लॉक असणार आहे.

उपनगरीय गाड्यांची स्थिती कशी असेल?

  • कर्जतहून दुपारी १.१५ वाजता सुटणारी SKP-9 खोपोली लोकल आणि दुपारी २.५५ वाजता खोपोलीहून सुटणारी SKP-14 कर्जत लोकल रद्द करण्यात आली आहे.
  • सीएसएमटीवरून १२.२० वाजता सुटणारी खोपोली लोकल कर्जत येथे शॉर्ट टर्मिनेट होईल.
  • खोपोलीहून दुपारी १.४८ वाजता सुटणारी KP-8 CSMT लोकल कर्जतहून दुपारी २.१४ वाजता सुटेल.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.