ब्रिटीश ब्रॉडकास्टींग कार्पोरेशन अर्थात बीबीसी-इंडिया विरोधात अंमलबजावणी संचालनालयाने कारवाईचा बडगा उगारला आहे. ईडीने बीबीसी विरोधात परकीय व्यवस्थापन कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. बीबीसी इंडियावर फॉरेन एक्स्चेंज मॅनेजमेंट ऍक्ट (फेमा) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
( हेही वाचा : “बंड करून ९ महिने झाले आता आम्हाला विसरा… नव्याने पक्षबांधणी करा”, गुलाबराव पाटील यांचा ठाकरेंवर निशाणा)
बीबीसीत विदेशी निधीमध्ये अनियमितता झाल्याचे आढळून आले आहे. त्यानंतर ईडीने फेमा अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. काही दिवसांपूर्वी बीबीसीचा गुजरात दंगलीवरील माहितीपट वादात सापडला होता. केंद्र सरकारने या माहितीपटाच्या प्रदर्शनावर बंदी घातली होती. मागच्या वर्षी आयकर विभागाने बीबीसीच्या दिल्ली आणि मुंबई कार्यालयातही झडती घेतली होती. त्यानंतर मीडीयाचे स्वातंत्र्य अबाधित ठेवण्याच्या नावाखाली आंतरराष्ट्रीय पातळीवरून भारतावर दबाव बनवण्याचा प्रयत्न झाला. परंतु, भारतीय संस्थेने आपले अधिकार अबाधित ठेवत नियमानुसार कारवाई सुरू केल्याची माहिती ईडीतील सूत्रांनी दिली.
Join Our WhatsApp Community