विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते ‘अजित पवार नॉट रिचेबल’ अशा आशयाचा बातम्या गेल्या आठवड्यात माध्यमांवर दिसत होत्या. अजित पवार ८ एप्रिल रोजी एका कार्यक्रमातून अचानक निघून गेले आणि त्यानंतरचे कार्यक्रम त्यांनी रद्द केले. त्यानंतर अजित पवार नॉट रिचेबल आहेत अशा बातम्या प्रसिद्ध होऊ लागल्या. त्याचदरम्यान सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा पहाटेच्या शपथविधीचा फोटो ट्वीट केला. ‘किळसवाणे राजकारण मी पुन्हा येईन’, असे कॅप्शन त्यांनी दिले होते. तत्यामुळे अजित पवार देवेंद्र फडणवीसांच्या संपर्कात असल्याचा चर्चा सुरू झाल्या. त्यावर दुसऱ्या दिवशी अजित पवारांनी माध्यमांसमोर येऊन उत्तर तर दिले, मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही यावर तीव्र प्रतिक्रिया दिली.
विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी ९ एप्रिल रोजी सकाळी नियोजित कार्यक्रमांना सुरुवात केली आणि ते नॉट रिचेबल असण्याच्या बातम्या खोट्या ठरवल्या. दरम्यान, पवार यांनी त्यावेळी माध्यमांच्या प्रतिनिधींसमोर नाराजी देखील व्यक्त केली. पवार म्हणाले की, काल काम करत असताना मला पित्ताचा त्रास होऊ लागला. जागरण आणि दौरे जास्त झाले की मला पित्ताचा त्रास होतो. तो खूप वर्षांपासूनचा त्रास आहे. त्यानंतर मी डॉक्टरांकडून औषधे घेतली आणि झोपलो. आज बरे वाटू लागल्यानंतर सकाळपासून मी कार्यक्रम सुरू केले. परंतु याच काळात माध्यमे कसल्याही बातम्या दाखवत होती. त्या बातम्या पाहून मला वाईट वाटत होते.
(हेही वाचा मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! अखेर ‘या’ मेट्रो स्थानकांच्या नावात बदल)
दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनीदेखील या घटनेवर त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. इंडिया टुडे कॉनक्लेव्हमध्ये देवेंद्र फडणवीस म्हणाले की, परवा अजितदादा कुठल्या तरी पुण्याच्या कार्यक्रमातून निघून गेले. त्या दिवशी मी मुंबईतल्या घरी फाइल्स क्लिअर करण्याचे काम करत होतो. त्यावेळी ‘परत सुरू झाले’ अशा चर्चा सुरू झाल्या. पण त्या दिवशी मी माझ्या घरी काही पत्रकारांना गप्पा मारायला बोलावले होते. त्यामुळे पत्रकार माझ्याच घरी होते. पण तिकडे चर्चा अशा सुरू होत्या की, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार नागपूरला भेटले. मी मुंबईत आणि अजित पवार कुठे आहेत हे मला माहिती नव्हते.
Join Our WhatsApp Community