‘जय श्रीराम’च्या घोषणा दिल्यामुळे हिंदू तरुण ५ दिवस होते तुरुंगात 

114

नयानगर, मीरा रोड येथील सार्वजनिक लोढा रस्त्यावरील मोहम्मदी मशिदीजवळून हातात भगवे झेंडे धरत ‘जय श्रीराम’च्या घोषणा दुचाकीवरून जात असलेल्या 4 हिंदू युवकांना 6 एप्रिलला तेथील उपस्थित मुस्लिम समाजाच्या जमावाच्या दबावामुळे पोलिसांनी अटक केली होती. या युवकांना न्यायालयाने आता जामीनावर सोड़ले आहे. ‘हिंदू टास्क फोर्स’चे संस्थापक वकील खुश खंडेलवाल यांनी या युवकांना विनामूल्य कायदेशीर साहाय्य केले.

ज्या ठिकाणी घटना झाली तो मीरा रोड येथील नयानगर येथे मुस्लिम समाजाची जनसंख्या जास्त असल्याने हा मुस्लिमबहुल भाग आहे. या घटनेत हिंदू युवक दुचाकीवरुन जात असताना उपस्थित असलेल्या मुस्लिमांच्या जमावाने त्यांना पकडले आणि मुस्लिमांच्या जमावाने त्यांना पोलिसांच्या स्वाधीन केले. काही वेळातच त्याच परिसरात गस्त घालणारे पोलिसही घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी आय.पी.सी.चे कलम 153 ए, 143 आणि 120 बी दाखल करुन त्वरित प्रथम माहिती अहवाल (FIR) क्र. 186/2023 नयानगर पुलिस ठाण्यात दाखल केला.

(हेही वाचा पाकिस्तानच्या ‘या’ क्रिकेटपटूने भारताविरोधात ओकली गरळ  )

काय म्हणाले वकील खुश खंडेलवाल? 

”जय श्रीराम’ च्या घोषणा दिल्यामुळे अटक करणे हे ‘153 ए’ किंवा अन्य कुठल्याही कलमात बसत नाही. जर ‘जय श्रीराम’ च्या घोषणा देणे हा गुन्हा ठरत असेल तर सर्वत्र वर्षभर दररोज सकाळपासून मशिदींवरील भोंग्यांवरून अजानमुळे हिंदूंना पूजा करण्यात व्यत्यय येतो तसेच सर्व नागरिकांनाही मोठ्या ध्वनीचा त्रास होतो. अशा मशिदींवरही कारवाई करायला हवी. काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत भारत देश ‘प्रादेशिक दृष्ट्या धर्मनिरपेक्ष’ (Territorial Secular) मानला जातो, त्यामुळे अमुक क्षेत्र मुस्लिमबहुल आहे असे कारण पुढे करुन तिथे वावर करताना हिंदु धर्म किंवा अन्य पंथाच्या लोकांवर कथित गुन्हे दाखल करणे हे चुकीचे आहे. कथित गुन्हे दाखल करुन हिंदूंना जाणीवपूर्वक त्रास देणाऱ्या विरोधात आमचा कायदेशीर लढ़ा सुरुच राहील.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.