मुंबई ते करमाळी दरम्यान धावणाऱ्या तेजस एक्सप्रेसला आणखी एक विस्टाडोम डबा जोडण्यात येणार आहे. तसेच १४ एप्रिलपासून हा बदल होणार आहे. या ट्रेनमध्ये असलेल्या ओपन खिडक्या, पारदर्शक छतांसाठी ही गाडी प्रवाशांमध्ये लोकप्रिय आहे.
मुंबई – करमाळी मार्गावर धावणाऱ्या तेजस एक्सप्रेसला सप्टेंबर २०२२ मध्ये एक विस्टाडोम डबा जोडण्यात आला होता. प्रवाशांची मागणी लक्षात घेऊन या ट्रेनला आणखी एक विस्टाडोम डबा जोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
तेजस एक्सप्रेस सोडून इतर कोणत्याही ट्रेनला दोन विस्टाडोम डबे आतापर्यंत जोडण्यात आलेले नाहीत. त्यामुळे दोन विस्टाडोम डबे असलेली ही देशातील पहिली ट्रेन आहे. कोकणातीन जनशताब्दी एक्स्प्रेसला सुद्धा एकच विस्टाडोम कोच आहे.
आता ‘तेजस’ची रचना अशी असणार…
२ विस्टाडोम डबे
११ एसी चेयर कार
१ एसी एक्जीक्यूटिव चेअर कार
२ लगेज कोच
१ जनरेटरचा डबा
विस्टाडोम डब्याची विशेषता
या डब्यातल्या खुर्च्या ३६० डिग्री फिरतात. डब्याच्या दोन्ही बाजूला असणाऱ्या मोठ्या काचेच्या खिडक्या, वरच्या बाजूला असलेलं पारदर्शक छप्पर यासाठी प्रवासी या डब्याची आवर्जून निवड करतात. यामुळे प्रवाशांना बाहेरील निसर्ग सौंदर्याचा अनुभव घेता येतो.
इतर आकर्षक सुविधा
- एलसीडी स्किन
- वाय – फाय
- निरीक्षण कक्ष
- जीपीएस
- आपोआप उघडणारे दरवाजे