म्हाडाची मुंबईत मोठी लॉटरी; तब्बल ४ हजार घरांसाठी निघणार सोडत

130

मुंबईत हक्काचे घर विकत घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी मोठी संधी येत आहे. एप्रिल महिन्यात मुंबईत म्हाडाच्या घरांची सोडत निघण्याची दाट शक्यता आहे. म्हाडा मुंबई बोर्डाचे अध्यक्ष मिलिंद बोरीकर यांच्या म्हणण्यानुसार, गोरेगावमध्ये म्हाडाच्या दोन मोठ्या प्रकल्पांना या महिन्याअखेर ऑक्सूपेंसी सर्टिफिकेकट (OC Certificate) मिळणार आहे. तसेच रहिवाशांना पजेशन देण्यासाठी इतर विभागाची मान्यतादेखील प्राप्त झाली आहे. मात्र काही विभागांकडून परवानगी मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. ओसी सर्टिफिकेट प्राप्त झाल्यानंतर गोरेगावसह अन्य विभागातील घरांची सोडतही जाहीर केली जाईल.

मुंबईत म्हाडा चार हजार घरांसाठी सोडत काढणार आहे. यात सर्व गटातील घरांचा समावेश आहे. यात सर्वाधिक घरे २,६३८ घरांचा प्रकल्प गोरेगाव येथे आहे. त्याचबरोबर, कन्नमवार नगर, वांद्रे, बोरिवली, मागाठाणेसह अन्य ठिकाणांचाही समावेश आहे. २०१९मध्ये मुंबईत म्हाडाची सोडत निघाली होती, त्यानंतर तब्बल चार वर्षांनंतर आता ही सोडत निघणार आहे. कोकण बोर्ड ४,६६४ घरांसाठी १० मे रोजी लॉटरी जारी करण्यात आली आहे. रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरु झाली असून आतापर्यंत ३३ हजार लोकांनी रजिस्ट्रेशन केले आहे.

(हेही वाचा ५० वर्षांपेक्षा अधिक राजकीय कारकीर्दीचे फलित साडेतीन जिल्ह्यांचा अधिपती?)

गोरेगावमध्ये म्हाडाचे ए आणि बी असे दोन प्रकल्प तयार होत आहेत. लिंक रोडजवळील मेट्रो ठाण्याजवळ असलेल्या ए प्रकल्पात EWSसाठी (अत्यल्प गट) २३ माळ्यांच्या सात इमारती आहेत. यात ३२२ चौरस वर्गाची १,२३९ घरे आहेत. तर, एसव्ही रोडजवळ असलेल्या ब प्रकल्पात ४-४ इमारती ईड्ब्लूएस आणि एलआयजी (अल्प गट)साठी राखीव आहेत. गोरेगावमध्ये ईडब्लूएससाठीच्या घरांच्या किमती ३५ लाख इतक्या असू शकतात. तर, एलआयजीसाठी ४५ लाख रुपयांपर्यंत किंमत असू शकते. एमआयजी आणि एचआयजीसाठीची घरे अद्याप तयार होत आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.