‘ही’ भारतीय मेट्रो धावली पाण्याखालून; रचला नवा विक्रम

95

देशातल्या वेगवेगळ्या शहरांमध्ये मेट्रोचे जाळ पसरत आहे. १९८४ साली देशातील सर्वांत पहिली मेट्रो पश्चिम बंगालमध्ये धावली होती. आता पाण्याखालून धावणारी पहिली मेट्रो बनवण्याचा मान याच राज्याने मिळवला आहे.

१२ एप्रिलला ही मेट्रो पाण्याखालून धावली आणि हा दिवस ऐतिहासिक बनला. हूगळी नदीच्या तळापासून जवळपास ३२ मीटर खोल बोगदा खणण्यात आला आहे. या बोगद्यातून मेट्रोने यशस्वी प्रवास केला. कोलकाता मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनद्वारे या प्रकल्पाची निर्मिती करण्यात आली आहे. या बोगद्याच्या निर्मितीसाठी सुमारे १२० कोटी रूपये खर्च करण्यात आला आहे.

मेट्रोचे जनरल मॅनेजर यांनी बुधवारी (१२ एप्रिल) ११:५५ च्या सुमारास मेट्रोच्या रेक नंबर एमआर ६१२ मधून प्रवास केला. महाकरण ते हावडा मैदान या दोन स्टेशनदरम्यान त्यांनी प्रवास केला. शिवाय त्यांच्या सोबत मेट्रोचे एडिशनल जनरल मॅनेजर आणि इतर अधिकारी होते. हावडा मैदान स्टेशनला पोहोचल्यावर कोलकाता मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनच्या जनरल मॅनेजर यांनी पूजा केली होती.

मेट्रोचे जनरल मॅनेजर रेड्डी यांनी या संपूर्ण प्रकल्पाचं वर्णन ‘ऐतिहासिक क्षण’ म्हणून केलं. महाकरण ते हावडा मैदान स्टेशन दरम्यान पुढच्या सात महिन्यांमध्ये मेट्रोच्या चाचणी फेऱ्या होतील. या चाचणी फेऱ्यांमध्ये यश मिळणं आवश्यक आहे. त्यात यश मिळाल्याशिवाय सर्वसामान्यांसाठी ही मेट्रो सेवा खुली करण्यात येणार नाही. तरी या वर्षभरात ही सेवा प्रवाशांसाठी खुली होईल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.

मेट्रोची वैशिष्टये

– इंजिनीअरिंगचा उत्कृष्ट नमुना
– २०१७ मध्ये बोगद्याची बांधणी पूर्ण
– हावडा हे जमिनाखाली असलेलं सर्वात खोल मेट्रो स्टेशन
– बोगदा पार करायला फक्त ४५ सेकंद

जवळपास ९.१ किलोमीटर पसरलेल्या या ईस्ट – वेस्ट मेट्रो लाईनची साल्ट लेक सेक्टर व्ही ते सियालदह ही मार्गिका प्रवाशांसाठी खुली आहे. यातल्या पहिल्या टप्प्याचे उद्धाटन फेब्रुवारी २०२० मध्ये झालं होतं. तर दुसऱ्या टप्प्याची सुरुवात २०२२ च्या जुलैमध्ये झाली.

(हेही वाचा – मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! अखेर ‘या’ मेट्रो स्थानकांच्या नावात बदल)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.