अतिक अहमदचे ‘लष्कर-ए-तोयबा’ आणि ‘आयएसआय’शी संबंध; यूपी पोलिसांच्या आरोपपत्रातून धक्कादायक खुलासा

115

उत्तर प्रदेशातील कुख्यात गुंड अतिक अहमद याचे दहशतवादी संघटना लश्कर-ए-तोय्यबा आणि पाकिस्तानी गुप्तहेर संघटना इंटर सर्विसेस इंटेलिजन्सशी (आयएसआय) थेट संबंध असल्याचा धक्कादायक खुलासा उत्तर प्रदेश पोलिसांच्या आरोपपत्रात झाला आहे. खुद्द अतिक यानेच हा कबुलीनामा दिल्याची माहिती पोलिसांनी या आरोपपत्रात नमूद आहे.

या आरोपपत्रामधून जो खुलासा झाला आहे, त्यात अतिक अहमद म्हणतो की, मला शस्त्रास्त्रांची कमतरता कधीही भासली नाही. कारण माझे पाकिस्तानी दहशतवादी संघटना लश्कर-ए-तोय्यबा आणि आयएसआय यांच्याशी थेट संबंध होते. या दोन्ही संघटना पाकिस्तानमधून पंजाब बॉर्डरवर ड्रोनच्या माध्यमातून शस्त्रास्त्रे टाकायच्या. त्यांचे भारतातले एजंट ते तिथून गोळा करून जम्मू काश्मीर मधल्या दहशतवादी संघटनांच्या म्होरक्यांना आणि भारतातल्या इतर राज्यातील माफियांना ही शस्त्रे पोहोचवायचे. पंजाबमधली अशी अनेक ठिकाणी माहिती आहेत, जिथे हे घडते. मला जर प्रत्यक्ष तिथे नेऊन तपास केला तर तिथून आजही शस्त्रास्त्रे, पैसा, फेक करन्सी रिकव्हर करायला मी मदत करेन, हा लेखी कबुलीनामा अतिक अहमद याने पोलिसांना दिला आहे आणि याचा उल्लेख पोलिसांनी उमेश पाल हत्याकांडातील आरोप पत्रात केला आहे.

याचा अर्थ उमेश पण हत्याकांड ही केवळ आयसोलेटेड फॉर्ममध्ये घडलेली घटना नाही तर त्याचा आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनांची संबंध आहे. दरम्यान उमेश पाल हत्याकांडातील आरोपी अतिक अहमद याचा मुलगा असद आणि त्याचा साथीदार मसूदचा मुलगा गुलाम या दोघांचा उत्तर प्रदेश पोलिसांनी गुरुवारी झाशीमध्ये एन्काऊंटर केले. त्यानंतर त्या दोघांकडून अत्याधुनिक बनावटीची दोन पिस्तुले जप्त केली यापैकी एक ब्रिटिश बुलडॉग रिवाल्वर .455 बोअरचे आहे, तर दुसरे वॉल्थर पी 88 7.63 बोअरचे पिस्तूल आहे. ही अत्यंत घातक शस्त्र मानली जातात पोलिसांनी ही शस्त्रे त्या दोघांकडून जप्त केली आहेत. या गुन्हेगारांकडून इतकी अत्याधुनिक शस्त्रे सापडणे हे अतिकच्या पाकिस्तानी कनेक्शनला अधोरेखीत करते

(हेही वाचा – उमेश पाल हत्याकांड : जाणून घ्या आतापर्यंत किती एन्काऊंटर झाले?)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.