मुंबई महानगरपालिका कामगार विभागाच्या विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ५१व्या आंतरविभागीय खात्यांतर्गत यंदाच्या नाट्य स्पर्धेत मुंबई महानगरपालिकेच्या ‘आर मध्य’ विभागाने सादर केलेल्या ‘निर्वासित’ या नाटकाने प्रथम क्रमांक पटकावला. तर कर निर्धारक व संकलक मुख्यालय विभागाने सादर केलेल्या ‘माझा खेळ मांडू दे’ या नाटकाला द्वितीय, तसेच केईएम रुग्णालय अधिष्ठाता विभागाने सादर केलेल्या जेंडर अँड आयडेंटिटी या नाटकाने तृतीय क्रमांक पटकावला. तर अनुप येरुणकर यांना ‘जेंडर अँड आयडेंटिटी’ या नाटकातील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून आणि प्रियांका जाधव यांना ‘निर्वासित’ या नाटकातील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून गौरविण्यात आले.
बृहन्मुंबई महानगरपालिका कामगार विभागाच्या विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ५१व्या आंतरविभागीय खात्यांतर्गत नाट्यस्पर्धा सन २०२२-२३चा पारितोषिक वितरण समारंभ नामवंत सिने नाटय कलावंत, अभिनेते सुबोध भावे यांच्या हस्ते गुरुवारी, १३ एप्रिल २०२३ रोजी सायंकाळी भायखळा येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाटयगृह येथे पार पडला.
याप्रसंगी समारंभाच्या अध्यक्षस्थानी महापालिका सह आयुक्त (सामान्य प्रशासन विभाग) मिलिन सावंत उपस्थित होते. तर सहआयुक्त (करनिर्धारण व संकलन) सुनील धामणे, सहआयुक्त (आयुक्त कार्यालय) चंद्रशेखर चोरे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते. उप आयुक्त (विशेष) संजोग कबरे, उप आयुक्त (सार्वजनिक आरोग्य) संजय कुऱ्हाडे, उप आयुक्त (घनकचरा व्यवस्थापन) चंदा जाधव, उप आयुक्त (विशेष अभियांत्रिकी) चक्रधर कांडलकर, प्रमुख अभियंता (विकास नियोजन) सुनील राठोड, संचालक (वैदयकीय शिक्षण व प्रमुख रूग्णालये) डॉ. नीलम अंद्रादे, केईएम रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. संगीता रावत, बा.य.ल. नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रवीण राठी, नगर अभियंता गिरीश निकम, व्यवसाय विकास विभागाच्या प्रमुख शशी बाला, नृत्यांगना अंकिता वालावलकर आणि मान्यवरांची उपस्थिती होती.
यंदाच्या नाट्यस्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे
उत्कृष्ट नाटयप्रयोग
१) निर्वासित (सहायक आयुक्त आर मध्य विभाग) (प्रथम क्रमांक)
२) माझा खेळ मांडू दे (कर निर्धारक व संकलक मुख्यालय), (द्वितीय क्रमांक)
३) जेंडर अँड आयडेंटिटी (अधिष्ठाता, रा. ए. स्मा. रुग्णालय), (तृतीय)
४) लोकोमोशन (सहायक आयुक्त, ए विभाग (उत्तेजनार्थ)
५) आत्मकथा (जलअभियंता ), (उत्तेजनार्थ)
उत्कृष्ट अभिनेता
१) अनुप येरुणकर, जेंडर अँड आयडेंटिटी (प्रथम),
२) अजिंक्य नंदा, निर्वासित (द्वितीय),
३) किरण पाटील, घंटानाद (तृतीय)
उत्कृष्ट अभिनेत्री
१) प्रियांका जाधव, निर्वासित (प्रथम),
२) अपर्णा शेट्ये , माझा खेळ मांडू दे (द्वितीय),
३) वंदना गानू , घंटा (तृतीय)
उत्कृष्ट रंगभूषा
१) भरत बेंडगुळे (प्रथम)
उत्कृष्ट वेशभूषा
१) रुबी जेम्स, शुधाग्नी (प्रथम),
२) तृप्ती गिरकर, जेंडर अँड आयडेंटिटी (द्वितीय)
लक्षवेधी भूमिका
१) महेश अनुदत्त , इच्छा माझी पुरी करा (प्रथम क्रमांक)
उत्कृष्ट नाटय लेखन
१) निर्वासित (प्रथम),
२) माझा खेळ मांडू दे (द्वितीय),
३) जेंडर अँड आयडेंटिटी (तृतीय)
उत्कृष्ट नेपथ्य
१) संदेश जाधव, शुधाग्नी (प्रथम),
२) जयेश पवार , थोडसं लॉजिक थोडसं मॅजिक (द्वितीय)
उत्कृष्ट संगीत
१) महेंद्र मांजरेकर, ती रात्र (प्रथम),
२) कुणाल तांबे, सुरु (द्वितीय)
उत्कृष्ट प्रकाश योजना
१) प्रकाश गोठवणकर, निर्वासित (प्रथम),
२) राजविलास इंगळे, आत्मकथा (द्वितीय)
उत्तेजनार्थ पारितोषिक (पुरूष)
१) वैभव कदम, निर्वासित
२) अमित वैती, जेंडर अँड आयडेंटिटी
३) विनय चिंदवडकर, पी
४) नारायण पोत्रेकर, इच्छा माझी पुरी करा
५) कुणाल तांबे, सुरु
६) गणेश भालेराव, प्रश्न कायद्याचा आहे
७) प्रवीण भार्गव
८) रोहित पवार, ती रात्र
९) नरेश कांबळे, शुधाग्नी
१०) महेंद्र पवार , लोकोमोशन
११) संदेश जाधव, निर्वासित
१२) प्रथमेश भोसले, चेकमेट
उत्तेजनार्थ पारितोषिक (स्त्री)
१) श्रुतिका शिंदे, निर्वासित
२) श्रद्धा पोतनीस, माझा खेळ मांडू दे
३) मृदुला अय्यर, लोकोमोशन
४) स्नेहा ठोंबरे, इच्छा माझी पुरी करा
५) पूजा पाचरकर, सुरु
६) अर्चना कदम, थोडसं लॉजिक थोडसं मॅजिक
७) प्रणया गायकवाड, वाहते हि दुर्वांची जोडी
८) कल्पना भिसे, ती रात्र
९) भावना रहाटे, शुधाग्नि
१०) अनुष्का शिनारे, संगीता
११) विभावरी राणे, प्रश्न कायद्याचा आहे
१२) भारती रेगे – सावंत, चेकमेट
१३) संपदा सोनटक्के, आत्मकथा
१४) जुईली मेश्राम, निलवंती
१५) मंगला जाधव, धुम्मस
(हेही वाचा – अग्निशमन यंत्रणा सुस्थितीत असल्याचे प्रमाणपत्र महानगरपालिका संकेतस्थळावर सादर करा, अन्यथा….)
Join Our WhatsApp Community