पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्यादरम्यान मुंबईमधील अनेक रस्त्यांचा कायापालट झाला होता. तसेच G – २० परिषदाचे औचित्य साधून मुंबई मधील रस्त्यांचे सुशोभीकरण करण्यात आले होते. अशातच आता ‘महाराष्ट्र भूषण’ या सोहळ्याचं औचित्य साधून पुन्हा एकदा एका रस्त्याचा कायापालट झाला आहे.
येत्या रविवारी म्हणजेच १६ एप्रिल २०२३ रोजी निरुपणकार डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना ‘महाराष्ट्र भूषण’ या महारष्ट्रातील सर्वोच्च पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. हा पुरस्कार सोहळा खारघर येथील आंतरराष्ट्रीय कॉर्पोरेट मैदानावर सकाळी साडेदहा वाजता संपन्न होणार आहे. या सोहळ्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उपस्थित राहणार आहेत.
(हेही वाचा – उन्हाळ्यात रेल्वे सोडणार विशेष गाड्या; मुंबई-पुण्यातून सात गाड्यांच्या होणार तब्बल ८८ फेऱ्या)
त्यामुळे खारघरवासियांचे २० वर्षांपूर्वीचे स्वप्न अखेर पूर्ण झाले आहे. खारघर येथील कोपरा गावासमोरील एका रस्त्याची गेल्या १५ ते २० वर्षांपासून दुरवस्था झाली होती. त्या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी स्थानिक नागरिकांनी अनेकदा पनवेल महापालिकेकडे अर्ज दिले होते; मात्र तरीही या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम झाले नाही. ते आता महाराष्ट्र भूषण कार्यक्रमाच्या निमित्ताने एका रात्रीत झाले. पालघर महापालिकेने केवळ एका रात्रीत या रस्त्याचे रूपांतर नव्या-कोऱ्या रस्त्यामध्ये केले आहे. त्यामुळे महाराष्ट्र भूषण या कार्यक्रमामुळे खारघरवासियांचे नशीब पालटले आहे.
या सोहळ्यासाठी केंद्रीय गृहमंत्र्यांसह अमित शहा यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित राहणार आहेत. तसेच या सोहळ्यासाठी लाखोंच्या संख्येने नागरिक येणार असल्याने वाहनांची कोंडी होऊ नये याची काळजी घेण्यासाठी पनवेल महापालिका यांच्याकडून रस्त्याचे हे काम करण्यात आले.
Join Our WhatsApp Community