यंदा राज्यात अवकाळी पाऊस आणि गारपीट थांबता थांबत नसल्याचे चित्र आहे. गेल्या काही दिवसांपासून विदर्भ, मराठवाड्यासह इतरही भागाला पावसाने झोडपून काढले आहे. अशातच हवामान विभागाकडून पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यामध्ये उत्तर महाराष्ट्र, कोकण आणि विदर्भातील काही जिल्ह्यांचा समावेश आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि कोल्हापूरमधील गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भ ते कर्नाटकाच्या किनारपट्टीपर्यंत निर्माण झालेली द्रोणीय स्थिती आणि राजस्थानच्या नैऋत्येकडे निर्माण झालेली चक्रीय वातस्थितीच्या परिणामाने पावसाळी स्थितीपासून राज्याला तात्काळ दिलासा मिळण्याची शक्यता लांबली आहे.
कोणत्या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस कोसळणार?
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, सांगली, सोलापूर, जळगाव, धुळे, नंदुरबार, परभणी, लातूर, नांदेड, हिंगोली, वाशिम, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, नाशिक, रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये वेगळ्या ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यांसह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुढील सात दिवसांच्या अंदाजानुसार राजधानी मुंबईत पुढील दोन दिवस दुपारनंतर किंवा संध्याकाळी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान, उकाड्याने हैराण झालेल्या मुंबईकरांना बुधवार आणि गुरुवारदरम्यानच्या मध्यरात्री अचानक आलेल्या मुसळधार पावसाने काही काळ गार वाऱ्यांचा अनुभव दिला. परंतु या विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह लावलेल्या जोरदार हजेरीमुळे पावसाने काही काळासाठी मुंबईकरांची चिंताही वाढवली होती. त्यानंतर गुरुवारचा दिवस पुन्हा एकदा उकाड्यामध्ये गेला.
(हेही वाचा ‘सर तन से जुदा’ नंतर आता ‘काफिर को काटेंगे’; ओडिसात धर्मांध मुसलमानांच्या घोषणा )
Join Our WhatsApp Community