वाकोल्यात दोन बेस्ट बसच्यामध्ये चेंगरून पोलीस अधिकाऱ्याचा दुर्देवी मृत्यू

193

मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक प्रवीण दिनकर या अधिकाऱ्याचा सांताक्रूझ पूर्व वाकोला येथे बेस्टच्या दोन बसच्यामध्ये चेंगरून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना शुक्रवारी सकाळी घडली. पोलीस अधिकारी दिनकर हे कर्तव्यावर जात असताना हा अपघात झाला असून याप्रकरणी वाकोला पोलिसांनी बेस्ट बस चालक गौतम लोखंडे यांच्या विरुद्ध निष्काळजीपणे वाहन चालवून एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूस कारणीभूत झाल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून बेस्ट बस चालक गौतम लोखंडे याला अटक करण्यात आली आहे.

नक्की काय घडले?

प्रवीण दिनकर (४५) हे पत्नी आणि दोन मुलीसह सांताक्रूझ पूर्व कालीना येथील अधिकारी वसाहत या ठिकाणी राहण्यास होते. मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक या पदावर असणारे दिनकर हे शुक्रवारी सकाळी कर्तव्यावर जाण्यासाठी घरातून मोटारसायकल वरून निघाले होते. सांताक्रूझ रेल्वे स्थानक येथे मोटारसायकल पार्क करून तेथून ते ट्रेन पकडून मरीन लाईन्स येथे जाणार होते. मोटारसायकलवरून सांताक्रूझ रेल्वे स्थानकाचा दिशेने जात असताना वाकोला मस्जिद बस थांबा येथे त्याच्या मोटारसायकलच्या पुढे असणारी बेस्ट बस थांबली होती, त्या बसच्या मागे प्रवीण दिनकर हे थांबलेले असताना पाठीमागून सुसाट वेगाने आलेल्या दुसऱ्या बेस्ट बसने दिनकर यांच्या मोटरसायकल जोरदार धडक दिली. या धडकेमुळे दिनकर हे दोन्ही बसच्यामध्ये चेंगरून गंभीररीत्या जखमी झाले, त्यांना तात्काळ बेस्ट बस वाहकाने इतर प्रवाशाच्या मदतीने व्ही,एन, देसाई रुग्णालयात उपचारासाठी आणले असता डॉक्टरांनी त्यांना उपचारासाठी दाखल करून त्याच्यावर उपचार सुरु केले. उपचार सुरु असताना साडे अकरा वाजता त्यांचा मृत्यू झाला. प्रवीण दिनकर यांच्या अपघाती मृत्यूने मुंबई पोलीस दलात हळहळ ब्यक्ती केली जात आहे.

या घटनेची माहिती मिळताच वाकोला पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन घटना स्थळाचा पंचनामा करून ज्या बेस्ट बसने पोलीस अधिकारी प्रवीण दिनकर याना धडक दिली त्या बसचा चालक गौतम लोखंडे याला बेस्ट बससह ताब्यात घेऊन चालक लोखंडे याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. गौतम लोखंडे हा बेस्ट बसचा कंत्राटी चालक असून त्याच्या म्हणण्यानुसार बसचे ब्रेक निकामी झाल्यामुळे बसचा अपघात झाला. त्यामुळे सध्या खरोखरच बेस्ट बसचे ब्रेक निकामी झाले होते याचा तपास सुरू आहे.

सुट्टीचा दिवस कुटुंबासोबत आनंदात घालवला अन्…..

प्रवीण दिनकर हे २००२ च्या बॅचचे अधिकारी असून मुंबईत त्यांची हि पहिलीच पोस्टिंग होती. वर्षभरापूर्वीच ते मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात रुजू झाले होते. मूळचे अहमदनगर जिल्ह्यातील पोलीस अधिकारी प्रवीण दिनकर हे मुंबईत येण्यापूर्वी नगर जिल्ह्यातील किनवट पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक या पदावर होते. पोलीस निरीक्षक पदी पदोन्नती नंतर त्यांची बदली मुंबई पोलीस दलात दाखविण्यात आली होती. २ फेब्रुवारी २०२२ रोजी त्यांची मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात रुजू झाले होते. प्रवीण दिनकर यांची मुंबईतील हि पहिलीच पोस्टिंग होती, यापूर्वी त्यांनी नगर जिल्ह्यातच पोलीस उपनिरीक्षक ते सहाय्यकी पोलीस निरीक्षक पदापर्यत कर्तव्य बजावले आहे. मुंबईत आल्यानंतर त्यांनी कलिना येथील अधिकारी वसाहत या ठिकानी पोलीस कॉटर्स मिळवले होते, काही महिन्यापूर्वी त्यांनी आपल्या कुटुंबाना मुंबईत आणले होते अशी माहिती पोलिसांनी दिली.

अपघाताच्या एक दिवसापूर्वी म्हणजेच गुरुवारी प्रवीण दिनकर यांची साप्तहिक सुट्टी असल्यामुळे ते कुटुंबासह अलिबाग येथे सुट्टी घालविण्यासाठी गेले होते, सुट्टीचा संपूर्ण दिवस दिल्यानंतर शुक्रवारी ते कर्तव्यावर जाण्यासाठी निघाले असता काळाने त्यांच्यावर झडप टाकली.

(हेही वाचा – दहावी पास ४ हजार तर बारावी पास ५ हजार रुपये; बनावट प्रमाणपत्र बनवून देणारी टोळी गजाआड)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.