कलिंगडाचे सेवन केल्याने होतात ‘हे’ फायदे

104

सध्या आपल्या येथील हवामानाचा काही अंदाज लावता येत नाही. कधी पाऊस, कधी थंडी, तर कधी अगदी रखरखीत ऊन. अशातच हवामान खात्याने लवकरच राज्यात उष्णतेची लाट येणार असल्याचे सांगितले आहे. अशा या वातावरणात आरोग्याची काळजी घेणं थोडं कठीण होतं. त्यामुळे उन्हाळयात आपल्या आहारात आपण काही विशेष पदार्थांचा समावेश करतो. उदाहरणार्थ काकडी, आंबा, कलिंगड वेगवेगळी पेयं इत्यादींचा समावेश केला जातो.

कलिंगड खाण्याचे फायदे जाणून घ्या

काही तज्ज्ञांच्या माहितीनुसार योग्य प्रमाणात कलिंगड खाल्ल्याने ७ दिवसांत वजन कमी होण्यास मदत होते. तसेच हायड्रेशन, पोषण सत्व, डिटॉक्सिफिकेशन इत्यादींसारखे फायदे होतात. कलिंगडामध्ये पाण्याचे प्रमाण अधिक असते, त्यामुळे आपल्या शरीर हायड्रेटेड राहण्यास मदत होते. त्यामुळे उष्ण ठिकाणी किंवा व्यायाम केल्यानंतर कलिंगड खाणे उपयुक्त ठरते. तसेच त्यामध्ये कमी-कॅलरी असतात. ज्यामुळे आपलं वजन कमी होण्यास मदत होते. कलिंगडात व्हिटॅमिन ए आणि सी असतात, त्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. कलिंगडामुळे लघवीचे प्रमाण वाढते आणि शरीरातील अतिरिक्त पाणी आणि विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत होते, यामुळे पोट फुगणे यासारखे आजार कमी होतात आणि पचनशक्ती देखील वाढते.

(हेही वाचा तेव्हा भगतसिंगांनीही ब्रिटिशांकडे सुटकेसाठी केले होते आवेदन; पुस्तकातून केला दावा )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.