उत्तर प्रदेश पोलिसांची दमदार कामगिरी : मागील सहा वर्षांत १० हजार चकमकीत १८२ आरोपींचा खात्मा

104

प्रयागराज येथील उमेश पाल हत्याकांडमधील मुख्य आरोपी आणि त्याच्या साथीदाराचा उत्तर प्रदेश पोलिसांकडून १३ एप्रिल २०२३ रोजी एन्काऊंटर करण्यात आला आहे. मुख्य आरोपी हा उत्तर प्रदेशमधील कुख्यात गँगस्टर अतिक अहमद याचा मुलगा असद अहमद होता. गेल्या काही दिवसांपासून उत्तर प्रदेशात चकमकींचे सत्र सुरु झाले आहे. उत्तर प्रदेश सरकारने नुकताच जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार आतापर्यंत जवळपास राज्यात १० हजार चकमकींची नोंद करण्यात आली आहे. तर, अशा चकमकीत ठार झालेल्यांची संख्या एकूण १८२ इतकी झाली आहे.

उत्तर प्रदेश येथे मागील सहा वर्षांत १० हजार ७१४ चकमकी झाल्या आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या चकमकींमध्ये ठार झालेल्यांवर गंभीर गुन्हे दाखल होते.

(हेही वाचा –अतिक अहमदचे ‘लष्कर-ए-तोयबा’ आणि ‘आयएसआय’शी संबंध; यूपी पोलिसांच्या आरोपपत्रातून धक्कादायक खुलासा

उत्तर प्रदेशमधील कोणत्या भागात किती चकमकी झाल्या?

  • मेरठ पोलिसांनी सर्वाधिक ३ हजार १५२ चकमकी केल्या आहेत. यामध्ये ६३ आरोपींचा खात्मा करण्यात आला, तर १ हजार ७०८ जखमी झाले. तसेच या चकमकींमुळे ५ हजार ९६७ आरोपींना अटक करण्यात आली आहे.
  • मेरठ पाठोपाठ आग्र्यात सर्वाधिक चकमकी झाल्या. येथे १ हजार ८४४ चकमकी झाल्या असून यामध्ये पोलिसांनी १४ आरोपींना मारले आहे. तर, यामुळे ४ हजार ६५४ आरोपींना अटक करण्यात आली.
  • बरेलीमध्येही १ हजार ४९७ चकमकींची नोंद झाली आहे. यामध्ये ७ आरोपी मारले गेले तर, ३ हजार ४१० आरोपींना पकडण्यात यश आले आहे.
  • तसेच गेल्या वर्षभराची म्हणजेच मार्च २०२२ ते मार्च २०२३ ची आकडेवारी पाहता या चकमकीत २३ आरोपी ठार झाले असून १,२५६ आरोपी जखमी झाले आहेत.
  • चकमकीनंतर पोलिसांनी आरोपींकडील सामानावरही कब्जा केला. पोलिसांकडून एकूण १,८४९.२८ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आलेली आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.