केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी अशी काही एक भविष्यवाणी केली आहे, ज्यामुळे पुन्हा एकदा देशातील राजकारण तापण्याची शक्यता आहे. २०२५च्या आधीच पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसचे सरकार कोसळणार आहे, अशी भविष्यवाणी अमित शाह यांनी केली.
ममता बॅनर्जी यांच्या सत्ताकाळात बंगाल बॉम्बस्फोटांचे केंद्र बनले
शुक्रवारी अमित शाह पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर होते. येथील बीरभूम जिल्ह्यातील सिऊडी येथे त्यांची सभा झाली. या सभेत बोलताना अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार टीका केली आणि २०२५च्या आधीच बॅनर्जी यांच्या नेतृत्वात असलेले सरकार कोसळले. ममता बॅनर्जी यांच्या सत्ताकाळात बंगाल बॉम्बस्फोटांचे केंद्र बनले आहे. भाजपचे सरकार येऊ द्या. त्यानंतर पुन्हा कधीच राम नवमीला हिंसाचाराच्या घटना घडणार नाहीत, असे शाह म्हणाले.
तसेच २०२४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान करायचे आहे. सन २०२४मध्ये भाजपला लोकसभेच्या ३५ पेक्षा जास्त जागा पश्चिम बंगलामधून जिंकून द्या, असे आवाहनही अमित शाह यांनी यावेळी केली.
दरम्यान आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने मोर्चेबांधणीला जोरदार सुरुवात केली आहे. यासाठी भाजपचे दिग्गज नेते देशातील अनेक लोकसभा मतदारसंघाचा दौरा करत पक्ष संघटना वाढण्यासाठी प्रयत्न करत आहेत. पश्चिम बंगाल, ओडिसा, दक्षिण भारतातील राज्यांवर भाजपचे अधिक लक्ष राहणार आहे. तसेच भाजप अल्पसंख्याक समुदाय आणि मागासवर्गीयांकडे विशेष लक्ष केंद्रीत करणार आहे.
(हेही वाचा – आशिष शेलार यांनी संजय राऊतांचा उल्लेख केला ‘सीरियल किलर’; नक्की काय म्हणाले?)
Join Our WhatsApp Community