शिंदे-फडणवीस, बावनकुळे-शेलारांची धाकधूक वाढली; अमित शहा तपासणार रिपोर्टकार्ड

90

ज्येष्ठ निरूपणकार अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा शनिवारी, १५ एप्रिलला मुंबईत येत आहेत. या दोन दिवसीय दौऱ्यात ते शिवसेना-भाजपा युती सरकारचे रिपोर्टकार्ड तपासणार आहेत. त्यामुळे शिंदे-फडणवीसांची धाकधूक वाढली आहे.

( हेही वाचा : चुलत भाऊ बनला पक्का वैरी, भावाला बनवले अतिरेकी! मुंबईत दहशतवादी शिरल्याचा केला खोटा कॉल)

शनिवारी सायंकाळी ७ वाजता त्यांचे मुंबई विमानतळावर आगमन होईल. त्यानंतर ते मुक्कामासाठी सह्याद्री अतिथिगृहावर पोहोचतील. ७.३० पासून रात्री उशिरापर्यंत ते सह्याद्री अतिथिगृहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह भाजपच्या प्रमुख नेत्यांसोबत चर्चा करतील. शिंदे – फडणवीस यांच्याकडून ते सरकारच्या कामगिरीचा, तर प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलारांकडून पक्षकार्याचा आढावा घेतील.

दरम्यान, मे महिन्यात आमदारांच्या अपात्रतेबाबत निकाल लागणार आहे. त्यामुळे सत्ताधारी चिंतेत आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपची रणनीती काय असेल, ‘बी’ प्लॅनची जबाबदारी कुणावर असेल, याबाबत अमित शहा मार्गदर्शन करणार असल्याचे कळते.

सरकार आणि पक्षाच्या कामगिरीचा आढावा घेणार

  • केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांचा प्रसार महाराष्ट्रात कशा रीतीने सुरू आहे, आतापर्यंत किती लाभार्थींना फायदा झाला, मनपा, लोकसभा, विधानसभा निवडणुकीत त्याचा पक्षाला कसा फायदा होईल, याची माहिती अमित शहा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून घेणार आहेत.
  • पक्षसंघटना वाढीसाठी राज्यात आणि मुंबईत सुरू असलेल्या प्रयत्नांची माहिती अनुक्रमे चंद्रशेखर बावनकुळे आणि आशिष शेलार यांच्याकडून घेतील. मुंबई पालिका, लोकसभा निवडणुकीपूर्वी कोणते बडे नेते पक्षात आणता येतील, यावरही चर्चा होईल. वादग्रस्त निर्णय, नेत्यांच्या वक्तव्याचे परिणाम याची माहिती अमित शहा यांना दिली जाईल.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.